शिवरायांचा वारसा शिवविचार जपणाऱ्या स्वराज्य प्रतिष्ठानने पुढे न्यावा…

10
2
Google search engine
Google search engine

प्रियांका नाईक; बांदा येथे आयोजित शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात…

बांदा,ता.२०: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यात महिला भगिनी या सुरक्षित होत्या. महिलांना अत्यंत मनाचे व आदराचे स्थान होते. सद्यास्थितीत महिलांवर होणारे अत्याचार, दुराचार रोखण्यासाठी महिलांच्या सक्षमीकरणाची खऱ्या अर्थाने गरज आहे. छत्रपती शिवरायांचा हा वारसा शिवविचार जपणाऱ्या श्री स्वराज्य प्रतिष्ठानने पुढे न्यावा असे आवाहन सरपंच प्रियांका नाईक यांनी येथे केले.

स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने येथील खेमराज प्रशाळेच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या शिवजन्मोत्सव सोहळ्यात श्रीमती नाईक बोलत होत्या. याठिकाणी प्रतिष्ठानच्या वतीने भव्य किल्ल्याची प्रतिकृती उभारण्यात आली होती. यावेळी व्यासपीठावर ग्रामपंचायत सदस्या रुपाली शिरसाट, तनुजा वराडकर, रिया येडवे, रेश्मा सावंत, देवल येडवे, शिवव्याख्याते प्रा. रुपेश पाटील, पोलीस निरीक्षक शामराव काळे, उपनिरीक्षक समीर भोसले, बांदा केंद्रशाळेचे मुख्याध्यापक श्रीकांत आजगावकर, प्रतिष्ठानचे अध्यक्ष निलेश मोरजकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी पारंपारीक पद्धतीने व पुरोहितांच्या उपस्थितीत विधिवत शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. प्रेरणा महिला मंडळाच्या महिलांनी पाळणा गीत सादर केले. यावेळी उपस्थितांना गूळ-खोबऱ्याचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रा. पाटील यांनी शिवविचारांवर मार्गदर्शन केले. संस्थेच्या वतीने गेल्या आठ दिवसात शालेय, महाविद्यालयीन व खुल्या गटात विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी मान्यवरांच्या उलस्थितीत पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे.

चित्रकला स्पर्धा, गट: पाचवी ते आठवी (प्रथम तीन क्रमांकानुसार)- प्रिया देसाई (मिलाग्रीस हायस्कूल सावंतवाडी), संमीता दाभोलकर (मिलाग्रीस हायस्कूल सावंतवाडी), गौरांग देसाई (केंद्रशाळा बांदा नंबर एक), उत्तेजनार्थ: वेदीका मोर्ये (तळवडे नं. 2), प्राची गवस (खेमराज हायस्कूल बांदा), खुला गट- कृष्णा गावडे (खेमराज हायस्कूल बांदा), दिव्येश पाडळकर (यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक), राधाकृष्ण पावसकर (नाबर स्कूल बांदा), उत्तेजनार्थ- आचल आरोसकर (खेमराज हायस्कूल बांदा), तन्वी कुडव (साई विद्यामंदिर).

चित्रकला स्पर्धा, गट: अंगणवाडी ते पहिली- धैर्य कोळमेकर (माडखोल नं २), वेदांत वीर (केंद्र शाळा बांदा नंबर एक), राघव गावडे. उत्तेजनार्थ:- शुभ्रा सागर तेली (केंद्र शाळा बांदा नंबर एक), कविश पावसकर (दिव्य ज्योती स्कूल). गट पहिली ते चौथी:- निधी मंझीलकर (केंद्र शाळा बांदा नंबर एक), मेघराज गवस (वाफोली), यश आरोसकर (आरोस), उत्तेजनार्थ- काव्या चव्हाण (केंद्र शाळा बांदा नंबर एक), माधव डेगवेकर (पानवळ).

वक्तृत्व स्पर्धा, गट: पहिली ते चौथी- नील बांदेकर (केंद्र शाळा बांदा नंबर एक ), पार्थ सावंत (जिल्हा परिषद शाळा नं 2 , सावंतवाडी), साहील कोळापटे (केंद्र शाळा बांदा नंबर एक ), उत्तेजनार्थ- सई देसाई (जिल्हा परिषद शाळा नं 2 ,डेगवे) माधव डेगवेकर (व्ही एन नाबर स्कूल बांदा), गट पाचवी ते सातवी- प्रज्ञा मोर्ये, (खेमराज हायस्कूल बांदा), रेश्मा पालव

(इन्सुली हायस्कूल), नैतिक मोरजकर (केंद्र शाळा बांदा नंबर एक ), उत्तेजनार्थ- अस्मी मांजरेकर (आर पी डी हायस्कूल, सावंतवाडी), ईश्वरी वावळीये (केंद्र शाळा बांदा नंबर एक ). गट: आठवी ते बारावी- तन्वी सावंत (आर पी डी कॉलेज, सावंतवाडी), प्रणव नाईक (खेमराज हायस्कूल, बांदा), सिमरन तेंडोलकर (खेमराज हायस्कूल, बांदा), उत्तेजनार्थ- ऋतुजा गावडे (आर पी डी कॉलेज, सावंतवाडी), श्रावणी सावंत (नूतन मा. विद्यालय, इन्सुली), खुला गट- प्रसन्न सोनुर्लेकर (मळगाव), सिद्धी सावंत

(असनिये), सौ. शुभेच्छा संदीप सावंत (बांदा), उत्तेजनार्थ- प्राजक्ता मोरजकर (इन्सुली), अंजली सावंत (बांदा ).

पोवाडा/ शिवगीत गायन स्पर्धा- गट: पहिली ते चौथी- सर्वज्ञ वराडकर (केंद्र शाळा बांदा नंबर एक), मेघराज गवस (दिव्य ज्योती स्कूल , बांदा), साहील कोळापटे (केंद्र शाळा बांदा नंबर एक), उत्तेजनार्थ- एंजल डॅनी आलमेडा (केंद्र शाळा बांदा नंबर एक), दत्तराज काणेकर (केंद्र शाळा बांदा नंबर एक). गट पाचवी ते सातवी- अदिती मेस्त्री (केंद्र शाळा बांदा नंबर एक), राज साळुंखे (केंद्र शाळा बांदा नंबर एक), लौकिक तळवडेकर (केंद्र शाळा बांदा नंबर एक), उत्तेजनार्थ- उर्वी बांदेकर (केंद्र शाळा बांदा नंबर एक), श्रद्धा शेवाळे

(केंद्र शाळा बांदा नंबर एक). गट- आठवी ते बारावी- प्रणव नाईक (खेमराज हायस्कूल बांदा), प्राची गवस (खेमराज हायस्कूल बांदा), निकिता गवस (माध्यमिक विद्यालय डेगवे), उत्तेजनार्थ- श्रुती पोपकर (नूतन माध्यमिक विद्यालय, इन्सुली), खुला गट- एकता शिंदे (बांदा ), अंजली गोविंद सावंत (बांदा), गौरी बांदेकर (बांदा).

वेशभूषा स्पर्धा, गट- पहिली ते चौथी- सर्वज्ञ वराडकर (केंद्र शाळा बांदा नंबर एक), पार्थ उमेश सावंत (जिल्हा परिषद शाळा सावंतवाडी नंबर २), नील बांदेकर (केंद्र शाळा बांदा नंबर एक), उत्तेजनार्थ- मयुरेश हवालदार (नेमळे नंबर एक), समर्थ पाटील (केंद्र शाळा बांदा नंबर एक). गट पाचवी ते सातवी – नित्या महाजन (खेमराज हायस्कूल बांदा), संस्कार शिरोडकर (व्ही एन नाबर , बांदा), रिद्धी तावडे (खेमराज हायस्कूल बांदा), उत्तेजनार्थ- वैष्णवी पाटील (दिव्य ज्योती स्कूल, बांदा), नैतिक मोरजकर (केंद्र शाळा बांदा नंबर एक). खुला गट- प्राजक्ता मोरजकर (इन्सूली), आचल आरोसकर (खेमराज हायस्कूल, बांदा), पुजा कामत (बांदा), उत्तेजनार्थ- गीता यादव (खेमराज हायस्कूल, बांदा).

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जे डी. पाटील यांनी केले. स्पर्धाचे परीक्षण प्रा. डॉ. एन. डी. कार्वेकर, प्रा. अरुण सुतार, चंद्रकांत सावंत, गुरुनाथ नार्वेकर, विशाखा पालव, रुपाली शिरसाट यांनी केले. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष निलेश मोरजकर, उपाध्यक्ष केदार कणबर्गी, सचिव समीर परब, खजिनदार भूषण सावंत, अक्षय मयेकर, संकेत वेंगुर्लेकर, प्रथमेश राणे, नारायण बांदेकर, अनुप बांदेकर, प्रशांत गवस, हंसराज गवळे, तनिष मेस्त्री, शुभम बांदेकर, मंदार सावंत, सौ. रीना मोरजकर, वेदिका गावडे, मिताली सावंत, वैदेही वाडकर, कांता हळदणकर, महादेव धुरी, अजय आरोसकर, महेश गुळेकर आदी उपस्थित होते.