दांडी येथील जॉर्ज डिसोझा यांना पालिकेकडून टीडीआर सर्टिफिकेट प्रदान…

6
2
Google search engine
Google search engine

रस्त्यासाठी ५ गुंठे जागा पालिकेला दिली ; २५ वर्षे रखडलेल्या रस्त्याचा प्रश्न मार्गी…

मालवण, ता. ०३ : दांडी येथील जॉर्ज पीटर डिसोझा यांनी दांडी शाळा ते दांडेश्वर मंदिर मार्गावरील रस्त्यासाठी ५ गुंठे जागा मालवण पालिकेला दिली. याबाबत जॉर्ज यांना पालिकेच्या माध्यमातून टीडीआर सर्टिफिकेट देण्यात आले.
हे सर्टिफिकेट जागेच्या प्रमाणात एफएसआय उपलब्ध करून देणारे आहे. स्वतः बांधकाम करताना मिळालेल्या परवानगी पेक्षा जास्त बांधकामासाठी तसेच अन्य कोण बांधकाम करत असेल तर त्यांनाही हे सर्टिफिकेट विकत देऊन तेवढा एफएसआय त्याला मिळू शकतो. महत्वाचे असे हे टीडीआर सर्टिफिकेट आहे.
अनेक वर्षे रखडलेला हा रस्ता होण्यासाठी माजी नगरसेविका सेजल परब तसेच माजी नगरसेवक पंकज सादये, माजी नगरसेविका तृप्ती मयेकर यांसह तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शहर प्रमुख बाबी जोगी, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, माजी बांधकाम सभापती मंदार केणी, यतीन खोत यांचे सहकार्य लाभले. आमदार वैभव नाईक यांचे मार्गदर्शन या सर्व प्रक्रियेत महत्वाचे ठरले.
गेली २५ वर्षे रखडलेला रस्ता झाल्याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उपशहरप्रमुख सन्मेष परब यांनी जॉर्ज डिसोझा यांसह सर्व नागरिकांचे आभार मानले. पालिकेत जॉर्ज डिसोझा कुटुंबीय व माजी नगरसेविका सेजल परब यांना पालिका अधिकाऱ्यांनी टीडीआर सर्टिफिकेट सुपूर्द केले. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शहर प्रमुख बाबी जोगी, मंदार केणी, पंकज सादये, तपस्वी मयेकर, नरेश हुले, प्रसाद आडवणकर उपस्थित होते.