आंबोली येथील सिंधुदुर्ग सैनिक स्कूलच्या दोन विद्यार्थ्याची “एसएसबी” साठी निवड…

19
2
Google search engine
Google search engine

आंबोली ता. ०९: येथील सिंधुदुर्ग सैनिक स्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेजच्या अर्थव धोंडी परब आणि निशांत निशेल मोरे या दोन विद्यार्थ्यांची नुकतीच भारतीय सैन्य दलात “एसएसबी” साठी निवड करण्यात आली आहे. यापूर्वी तीन विद्यार्थ्यांची निवड झाली होती. दरम्यान नव्याने निवड झालेल्या दोन्ही विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष पी. एफ. डॉन्टस, संचालक आणि शिक्षक वर्गाकडून अभिनंदन करण्यता आले.
सिधुदुर्ग सैनिक स्कूल ही सैनिकी शिक्षण आणि प्रशिक्षण देणारी जिल्हयातील एकमेव शाळा आहे. सलग १९ वर्ष शिस्तप्रिय सक्षम साहसी विद्यार्थी घडविण्याचे अविरत कार्य करीत आहे. या यशात भर घालत अजून दोन विद्यार्थ्यांनी १२ वी नंतरच्या १०+२ Technical Entry च्या (SSB) मुलाखतीसाठी निवड झाली आहे. सैनिक स्कूलमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी १२ वी नंतरही आपले ध्येय पुर्ण करण्यासाठी प्रयत्न राहतात. भारत सरकारच्या रक्षा मंत्रालया मार्फत सेवा निवड समिती (SSB) व्दारे देशमरावून उच्च पदस्थ अधिकारी निवड करण्यासाठी मुलाखत घेतली जाते. विद्यार्थी थेट एसएसबी साठी निवडले जातात. यामध्ये सैनिक स्कूलच्या या दोन विद्यार्थ्यांनी आणखीनच भार घातली आहे. आतापर्यंत १४ विद्यर्थी एनडीए लेखी परिक्षा उत्तीर्ण झाले असून २२ विद्यर्थी एसएसबी साठी पात्र ठरले आहेत. एकूण १९ विद्यार्थी भारतीय सैन्यात वेगवेगळ्या पदावर देश सेवा बजावत आहेत.
या यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतूक संस्थेचे अध्यक्ष पि.एफ. डॉन्टस, सचिव सुनिल राऊळ, संचालक जॉय डॉन्टस, कार्यालयिन सचिव दिपक राऊळ, सर्व संचालक प्राचार्य नितीन गावडे व शिक्षकांकडून केले जात आहे.