देवगड येथे १२ मार्चला रंगपंचमी उत्सवाचे आयोजन…

5
2
Google search engine
Google search engine

देवगड ता.०९: नैसर्गिक पर्यावरण आणि मानवता विकास संस्था व नगरसेविका तन्वी चांदोस्कर यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरणपुरक रंगपंचमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार १२ मार्चला सकाळी १०:०० वा. वेळवाडी सडा ओपन जिम याठिकाणी हा उत्सव होणार आहे. या रंगपंचमी उत्सवात ५ ते १६ वर्षे वयोगटातील मुला-मुलींसाठी पर्यावरण पुरक रंग आणि रंगपंचमी, म्युझिकच्या तालावर साजरी केली जाणार आहे. या उत्सवाला येताना लहान मुलांसोबत पालकांनी येणे अनिवार्य आहे. तरी या आयोजित करण्यात आलेल्या रंगपंचमी उत्सावामध्ये जास्तीत-जास्त मुलांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.