आंबोलीत १ ते १५ एप्रिलला “कॅश कोर्स”चे आयोजन..

9
2
Google search engine
Google search engine

सैनिक स्कूलचा पुढाकार; इच्छुक विद्यार्थ्यांनी सहभाग घेण्याचे आवाहन…

आंबोली,ता.०९: येथील सैनिक स्कूलच्या माध्यमातून एनडीए परीक्षेच्या तयारीसाठी महत्वाच्या ठरणा-या कॅश कोर्सचे आयोजन करण्यात आले आहे .
१ एप्रिल ते १५ एप्रिल या काळात आंबोली येथे सैनिक स्कूलच्या परिसरात या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये तज्ञ शिक्षक सहभागी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांना या कोर्ससाठी प्रवेश घ्यायचा आहे त्यांनी अधिक माहितीसाठी संस्थेची संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.अधिक माहितीसाठी ९४२२०७३८४० या नंबर वर संपर्क साधावा. जास्तीत-जास्त विद्यार्थ्यांनी या कोर्स चा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे संस्थापक ब्रिगेडियर सुधीर सावंत आणि अध्यक्ष पी.एफ.डान्टस यांनी केले आहे.