साटेली येथील पैठणीच्या खेळात अमिता पाटकर विजेत्या…

7
2
Google search engine
Google search engine

नेहरू युवा केंद्र व एकता महिला मंडळाचे आयोजन; पाककला स्पर्धेत अमिता पालव प्रथम…

सावंतवाडी,ता.१०: नेहरू युवा केंद्र व एकता महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनानिमित्त साटेली येथे आयोजित पैठणीच्या खेळात सौ. अमिता चेतन पाटकर विजेत्या ठरल्या. तर सौ. अमिता अतुल पालव यांनी उपविजेते बक्षीस जिंकले. दरम्यान याच दिवशी घेण्यात आलेल्या पाककला स्पर्धेत अमिता पालव यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. तर प्रणिता जोग व वैष्णवी कांबळी यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांकाची पारितोषिके जिंकली. याप्रसंगी सर्व विजेत्यांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.

यावेळी औद्योगिक सहकारी संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालिका प्रज्ञा परब, राष्ट्रवादीचे नेते एम. के. गावडे, मळेवाड उपसरपंच हेमंत मराठे, विलास साटेलकर, ग्रामपंचायत सदस्य संभाजी नाईक, एकता महिला मंडळाच्या अध्यक्षा मिनल साटेलकर, सदस्य सविता पांढरे, अमिता पालव, ललिता नाईक, मैत्री ग्राम संघ अध्यक्ष हर्षदा कळंगुटकर, सचिव प्रणिता जोग, कोषाध्यक्ष रसिका नाईक, प्रशांत साटेलकर आदींसह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. याप्रसंगी घेण्यात आलेल्या पैठणी कार्यक्रमाचे निवेदन शुभम धुरी यांनी केले.