वन्य प्राण्यांकडून होणाऱ्या नुकसानीला कुचकामी मंत्री दीपक केसरकर जबाबदार…

48
2
Google search engine
Google search engine

बबन गावडे; समस्यांकडे लक्ष न दिल्यानेच शेतकऱ्यांना सोसावे लागत आहे नुकसान…

आंबोली,ता.१०: आंबोली परिसरात वन्य प्राण्यांनी उच्छाद मांडला आहे. वनविभागही हतबल आहे. या सर्व प्रकाराला जबाबदार कुचकामी आमदार तथा मंत्री दीपक केसरकर आहेत, असा आरोप शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे विभागीय अध्यक्ष बबन गावडे यांनी केला. दरम्यान आमदार-मंत्री असतानाही त्यांनी इथल्या भागातील समस्यांकडे कधी लक्ष दिले नाही. त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागत आहे, अशीही टीका त्यांनी केली आहे. याबाबत श्री.गावडे यांनी प्रसिद्धी पत्रक दिले.
त्यात असे नमूद केले आहे की, आंबोली आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ करण्याच्या घोषणा केसरकरांनी ४ वेळा केल्या. पत्रकार परिषद घेतल्या. शेतकऱ्यांसाठी इलेक्टिक फेंसिग करून देणार, महिलांना रोजगार देणार,१०० गायीम्हशींचा सामुदायिक गो पालन योजना, युवकांसाठी २ टक्केने पर्यटन कर्ज योजना ,अशा कित्येक योजनाच्या घोषणा आंबोलीत येऊन केसरकर यांनी केल्या. वास्तवात पर्यटन आणि रस्त्यासाठी थोडा फार निधी दिला तो ठेकेदारांसाठी. पर्यटन प्रकल्प हे स्वतः साठीच आणले. पर्यटन महामंडळाकडून त्याचा स्थानिकांना रुपया देखील फायदा नाही. आंबोली माझे दुसरे घर हे जमिनी वर लक्ष ठेवून. वास्तविक इथल्या स्थानिक लोकांसाठी आमदार म्हणून दीपक केसरकर यांनी काही केलेले नाही. सध्या इथले आमदार केसरकर हे कोल्हापूर चे पालकमंत्री आहेत, कॅबिनेट मंत्री आहेत.कोल्हापूर येथील मुख्य वन संरक्षक याना आदेश देऊन त्या ठिकाणच्या स्टाफ या ठिकाणी मागवून वन्य प्राणी उपाययोजना राबवू शकतात. वनविभागाला अन्य साहित्य त्यासाठी देणे तसे आदेश देणे ड्युटी देणे ही जबाबदारी या मंत्री महोदयांची आहे.या ठिकाणी त्यांनी फेंसिंग करून देणार अशी घोषणा केली होती.नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत देखील नाही.गोल्फ कोर्स हा प्रकल्प त्यांनी इथल्या जागेत आणला आहे. आपल्या १५ एकर जागेत मात्र आजूबाजूच्या शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही.त्यातून इथल्या लोकांना केसरकर यांचा कुचकामी पना आणि हवेत घोषणा करण्याच्या वलग्ना दिसून आल्या आहेत. मोठ्या प्रमाणात गवे,माकड,सांबर या वन्य प्राण्यांचा उच्छाद वाढला आहे याबाबत लोकांनी आता रोष व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. याला सर्वस्वी जबाबदार कुचकामी आमदार आहेत त्यामुळे लोकांना आता विचार करण्याची आवश्यकता आहे.वनखात्याने सुद्धा गांभीर्याने याकडे लक्ष देणे आवश्यक आहे, असे अनेक आरोप त्यांनी केले आहेत.