मिनी पोलिस चौकीचे संजू परबांच्या हस्ते उद्घाटन…

42
2
Google search engine
Google search engine

रफीक शेखचा पुढाकार; निलेश राणेंच्या वाढदिवसा दिवशी उपक्रम…

सावंतवाडी,ता.१७: माजी खासदार तथा भाजप युवा नेते निलेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अल्पसंख्यांक भाजप सेलचे जिल्हाध्यक्ष रफिक शेख यांच्या माध्यमातून आज येथील पालिका कार्यालयासमोर मिनी पोलीस चौकी उभारण्यात आली. या चौकीचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी शहर अध्यक्ष अजय गोंदावळे, माजी नगरसेवक आनंद नेवगी, गुरु मठकर, मनोज नाईक, दिलीप भालेकर, सत्यवान बांदेकर, समीर पालव आदी पदाधिकारी उपस्थित होते. या ठिकाणी चौकी उभारण्यात आल्यामुळे पोलिसांना त्याचा फायदा होणार आहे. यापूर्वी पोलिसांना उन्हात उभे रहावे लागत होते, मात्र आता त्या ठिकाणी पाणपोईचीही सोय करण्यात आली आहे.