युवती सेनेच्या वतीने वैभव नाईक यांचा वाढदिवस दिमाखात साजरा…

6
2
Google search engine
Google search engine

शिल्पा खोत यांची संकल्पना ; ढोल ताशांच्या गजरात जोरदार वातावरण निर्मिती…

मालवण, ता. २६ : आमदार वैभव नाईक यांचा वाढदिवस आज युवती सेनेच्या वतीने भरड नाका येथे ढोल ताशांच्या गजरात केक कापून आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला.

आमदार नाईक यांचा वाढदिवस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तालुक्यात विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येत आहे. यात युवती सेनेच्या कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाच्या प्रमुख शिल्पा खोत यांच्या संकल्पनेतून भरड नाका येथे आगळ्यावेगळ्या पद्धतीने आमदार नाईक यांचा वाढदिवस ढोल ताशांच्या गजरात, छोट्या आमदाराच्या भूमिकेत अधिराज खानोलकर, तनिष्का खोत यांच्यासह अन्य बालचमुंच्या उपस्थितीत केक कापून साजरा करण्यात आला. यावेळी भरड नाक्यावर लावण्यात आलेला भावी पालकमंत्री हा बॅनर लक्षवेधी ठरला होता.

यावेळी कुडाळ मालवण युवती सेना प्रमुख शिल्पा खोत, तालुकाप्रमुख दीपा शिंदे, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, माजी बांधकाम सभापती यतीन खोत, भाई कासवकर, विद्या फर्नांडिस, मंदा जोशी, उपतालुका प्रमुख रूपा कुडाळकर, पूजा तळाशीलकर, रूपा कांदळकर, आर्या गावकर, प्रतिभा चव्हाण, वैभवी चौकेकर, दिया पवार, दीपा पवार, निकिता तोडणकर, साक्षी पार्टे, मानसी घाडीगावकर, साक्षी मयेकर, कल्पिता जोशी, मिनिष चव्हाण, कोळंब सरपंच सिया धुरी, कांदळगाव उपसरपंच दिव्या परब, युवती सेना तालुकाप्रमुख निनाक्षी शिंदे, अमर सरमळकर, राजेश शेडगे, अनुष्का परब, आशालता परब, साक्षी कांदळकर, हर्षदा पाटकर, प्रियांका परब, सृष्टी चौकेकर, दशरथ गावकर, प्रज्ञा कदम, रुजाय फर्नांडिस, पॉली गिरकर, चेतन तळाशीलकर, मनस्वी कदम, हर्षल केळुसकर, श्रीकांत मालवणकर, शुभम पाटील, शुभ्या पाटील यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.