कनेडी बाजारपेठेतील हल्ल्याप्रकरणी संशयित आरोपींना अटक करा…

14
2
Google search engine
Google search engine

कुंभवडेच्या माजी सरपंचांची मागणी; पोलीस स्टेशन समोर उपोषणाचा इशारा…

कणकवली, ता. ०३ : तालुक्‍यातील कनेडी बाजारपेठ येथील शिवसेना कार्यालयात झालेल्या हल्ल्याप्रकरणी संशयित आरोपींना अटक करा अशी मागणी कुंभवडेेचे माजी सरपंच सूर्यकांत उर्फ आप्पा तावडे यांनी पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे. तसेच अटकेची कारवाई न झाल्‍यास उपोषणााला बसण्याचा इशाराही त्‍यांनी दिला आहे.
या निवेदनात त्यांनी म्हटले आहे, माझ्यावर हल्ला करण्यात आला होता. माझ्या वरील झालेल्या हल्लेखोरांवर अद्याप पर्यंत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. हल्लेखोर सागर सखाराम सावंत, संजना सावंत, सुनिल सावंत, संजय सावंत, अशोक कांबळे, मिलिंद मेस्त्री, सर्वेश दळवी, स्वप्नील चिंदरकर, प्रफुल्ल काणेकर, किशोर परब, संजय उर्फ बाबू सावंत, धोंडी वाळके, शुभम सावंत, प्रदीप कांबळे, दत्ताराम गावकर यांच्यावरती कलम ३०७, ३०४, ३०६, ३२४, ३२३, १४३, १४८, १४९, १४७ अशा गंभीर कलमांचा समावेश असून तसेच या आरोपींवर ३५३, ३३२, १४३, १४७, १४८, १४९, ५०६ हे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. सदर वरील गुन्हेगारांवरती कार्यवाही न केल्यास माझ्या जीविताला हानी पोचण्याची शक्यता टाळता येत नाही. तरी दोन दिवसांत आपण कार्यवाही न केल्यास मी माझ्या सहकार्यांसमवेत कणकवली पोलीस स्टेशन समोर उपोषणास बसणार आहे. वरील घटनेबाबत योग्य ती दखल घेऊन मला न्याय मिळावा अशी मागणी श्री तावडे यांनी या निवेदनाद्वारे केली आहे.