जिल्ह्यातील गुणवंत कॅरमपटूंचा जिल्हा बँकेकडून सन्मान…

8
2
Google search engine
Google search engine

नितेश राणेंकडून गौरव; राष्ट्रीय स्तरावर केली विजयाची नोंद…

सिंधुदुर्गनगरी,ता.०३: सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनच्या गुणवंत खेडाळूंनी कॅरम स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर आपल्या विजयाची नोंद करत यश संपादन केले.या सर्व खेडाळूंचे जिल्हा बँक प्रधान कार्यालय ओरोस येथे आमदार नितेश राणे यांनी त्यांचे कौतुक करत विजेत्यांना पुष्पगुच्छ देत सर्वांचे अभिनंदन केले.
यावेळी जिल्हा बँकेचे अध्यश मनिष दळवी, संचालक प्रकाश मोर्ये, संचालक बाबा परब, प्रभाकर सावंत, संतोष कानडे, मनोज रावराणे, कॅरम असोसिएशनचे सेक्रेटरी योगेश फणसळकर, खजिनदार राजेश निर्गुण आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी राज्य विजेती कु.केशर राजेश निर्गूण,राज्य उपविजेती कु मयुरी गावडे, शालेय राज्य उपविजेती कु.प्रणीता आयरे, राज्य चतुर्थ मानांकन प्राप्त कुमार अमुल्य घाडी या सावंतवाडीतील चौघा गुणवंत खेडाळूंचे आमदार नितेश राणे यांनी अभिनंदन केले