मनविसेच्या पहिल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या युनिटचा शुभारंभ…

15
2
Google search engine
Google search engine

यतीन माजगावकर, मिताली बांबर्डेकर यांची अध्यक्षपदी निवड…

मालवण,ता.०७: येथील शासकीय तंत्रनिकेतन येथे मनविसेच्या पहिल्या युनिटचे उद्घाटन मनसेचे प्रदेश सरचिटणीस परशुराम उपरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी यतीन माजगावकर व मिताली बांबार्डेकर यांची युनिट अध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार व अमित ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मनविसे रत्नागिरी सिंधुदुर्ग संपर्क अध्यक्ष तसेच मनविसे महाराष्ट्र राज्य कार्यकारणी सदस्य अमोल साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय तंत्रनिकेतन येथे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे मनविसेच्या मालवणातील पहिल्या महाविद्यालयीन युनिट उद्घाटनाचा सोहळा झाला. यावेळी युनिटचे उदघाटन माजी आमदार तथा मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांच्या हस्ते करण्यात आले. तालुकाध्यक्ष संदीप लाड यांच्या नेतृत्वाखाली महाविद्यालयाच्या युनिटमध्ये ६० विद्यार्थी, विद्यार्थिनींनी प्रवेश केला.
यावेळी मनविसे तालुकाध्यक्ष संदीप लाड, मनविसे तालुकाध्यक्षा विद्यार्थिनी प्राजक्ता पार्टे, महाराष्ट्र सैनिक वैभव माणगावकर तसेच मनविसे उपविभाग अध्यक्ष अभिजीत मेथर, विलेपार्ले विधानसभा महाराष्ट्र सैनिक तुषार जुवेकर आदी उपस्थित होते.