नवउद्योजकांसाठी कणकवलीत सुरू होणार इन्क्‍युबेशन सेंटर…

7
2
Google search engine
Google search engine

रविवारी अभियांत्रिकी महाविद्यालयात उद्‍घाटन ; नीतेश राणे यांची माहिती…

कणकवली, ता.७ : सिंधुदुर्गातूनही उद्योजक घडावेत. या उद्योजकांना पाठबळ आणि विविध क्षेत्रातील तज्‍ज्ञांचे मार्गदर्शन उपलब्‍ध व्हावे यासाठी अभियांत्रिकी महाविद्यालयात बिझनेस इन्क्युबेशन सेंटर सुरू केले जाणार आहे. रविवारी ९ एप्रिलला सकाळी ११ वाजता केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्याहस्ते या केंद्राचे उद्‌घाटन होईल अशी माहिती आमदार नीतेश राणे यांनी आज दिली.

श्री.राणे म्‍हणाले, कोकणातील पहिल्‍या इन्क्युबेशन सेंटरच्या उद्‌घाटन कार्यक्रमावेळी अभियांत्रिकी महाविद्यालय संस्थेच्या अध्यक्षा नीलम राणे, उपाध्यक्ष निलेश राणे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. हे इंक्युबेशन सेंटर भारत सरकार मान्यताप्राप्त असून केंद्र सरकारच्या सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग विभागांतर्गत नोंदणीकृत आहे.

ते म्‍हणाले, नव्या उद्योग उभारणीसाठी लागणाऱ्या सर्व सुविधा केंद्राच्या माध्यमातून पुरवल्‍या जाणार आहेत. त्‍याचा मोठा फायदा सिंधुदुर्गातील उद्योजकांना होणार आहे. सिंधुदुर्गासह कोकणातील नव उद्योजकांनी या केंद्राला भेट देऊन विविध उद्योग, व्यवसायाबाबतची माहिती घ्यावी. नवीन उद्योग सुरू करण्यासाठी लागणारा सर्व प्रकारचा बॅकअप या सेंटरमध्ये असणार आहे.