सिंधुदुर्गात लवकरच “टेक्निकल सेंटर” सुरू करणार…

5
2
Google search engine
Google search engine

नारायण राणे; ५०० एकर जमिनीत मोठीच इंडस्ट्रीज आणणार…

कणकवली,ता.०९: सिंधुदुर्गात लवकरच २०० कोटी रुपयांची गुंतवणूक करून “टेक्निकल सेंटर” सुरू करण्यात येणार आहे. त्या माध्यमातून अनेक रोजगार देणारे हात घडतील, असा विश्वास केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज येथे व्यक्त केला. भविष्यात ५०० एकर जमिनीत मोठी इंडस्ट्रीज उभारण्यात येणार. त्या माध्यमातून अनेकांना रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कोकणातील पहिल्या बिजनेस फाउंडेशन सेंटरचे उद्घाटन आज राणेंच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी एसएसपीएम संस्थेच्या अध्यक्षा सौ. निलम राणे, सचिव नितेश राणे, सदस्य श्रीमती. प्रगती नरे, कोकण भुमी टेक्नॉलॉजी इनक्युबेशन सेंटरचे डायरेक्टर श्री. अभिषेक तेंडुलकर व सौ. आसावरी राजोपाध्ये, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. अनिश गांगल, प्रशासकीय अधिकारी श्री. शांतेश रावराणे सर्व कर्मचारी व विद्यार्थी उपस्थितीत होते.

उद्घाटन प्रसंगी बोलताना केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले, विकासाच्या बाबतीत मी नेहमीच आग्रही आहे आणि म्हणूनच कणकवली दोन वेळा माझ्या सूक्ष्म लघु मध्यम उद्योग मंत्रालयाच्या माध्यमातून उद्योग प्रशिक्षण आणि प्रदर्शन कार्यक्रम घेतल्या नंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातून ३५० तरुण-तरुणींनी उद्योजक होण्यासाठी प्रस्ताव सादर केले सकारात्मक दृष्टीने काम केल्यास असे यश आणखीन मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.