वेंगुर्लेत उद्या भाजपाचा महाविजय जनसंपर्क अभियान अंतर्गत मेळावा..

6
2
Google search engine
Google search engine

साई मंगल कार्यालयात आयोजन; विविध योजनांच्या मोफत कार्ड वाटपाचा होणार शुभारंभ..

वेंगुर्ले,ता.११: भाजपाच्या महाविजय २०२४ जनसंपर्क अभियान , सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात गेली १५ दिवस सुरु आहे . सावंतवाडी तालुक्यातुन सुरु झालेले अभियान , दोडामार्ग तालुका तसेच वेंगुर्ले तालुक्यातील चार जि.प.मतदार संघात जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते व मतदारांचा उस्फूर्त प्रतिसाद लाभला आहे . या अभियानात गावागावातील  विविध विकास कामांचा शुभारंभ व भूमीपूजन करण्यात येत आहेत .

अभियानाच्या वेंगुर्ले तालुक्याच्या दुसर्‍या टप्प्यात उभादांडा पंचायत समिती मतदारसंघ व वेंगुर्ले शहर तसेच म्हापण जि. प. मतदारसंघात बैठकाचे आयोजन केले आहे .

बुधवार दिनांक १२ एप्रिलला सकाळी १०:३० वाजता आयोजित केलेल्या महाविजय २०२४ या अभियानात लाभार्थी मेळावा होणार असून , मोदी सरकारच्या ई – श्रम योजना , आयुष्यमान भारत योजना, सुकन्या समृद्धी योजनांच्या लाभार्थ्यांना मोफत कार्ड वाटपाचा शुभारंभ जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

भाजपाच्या माध्यमातून वेंगुर्ले शहरातील ५५० लाभार्थ्यांना मोफत ई – श्रम कार्ड चे वाटप , १५० आयुष्यमान भारत कार्ड वाटप तसेच ५० सुकन्या समृद्धी योजनेच्या पास बुकचे वाटप करण्यात येणार आहे .

तरी उभादांडा , परबवाडा व वेंगुर्ले शहरातील भाजपाच्या सर्व लोकप्रतिनिधी , पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वेळीच उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई व तालुक्याध्यक्ष सुहास गवंडळकर यांनी केले आहे.