आंबोलीत पकडण्यात आलेल्या ओव्हरलोड गाड्यांना साडेदहा लाखाचा दंड…

15
2
Google search engine
Google search engine

महसूल व आरटीओ विभागाची कारवाई; प्रभारी तहसीलदार मनोज मुसळेंची माहिती…

आंबोली,ता.२१: मनसेच्या दणक्यानंतर आंबोलीत पकडण्यात आलेल्या १८ वाहन चालकांकडुन तब्बल साडेदहा लाखाचा दंड वसूल करण्यात आला आहे. आरटीओ सिंधुदुर्ग आणि सावंतवाडी महसूल प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने ही कारवाई करण्यात आली होती. त्यातील वाळू वाहतूक करणार्‍या एका गाडी चालकाकडे जुना पास होता. तर अन्य गाड्यामध्ये ओव्हरलोड चिरे, वाळू, खडी आदी गौण खनिज होते. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली, अशी माहिती प्रभारी तहसीलदार मनोज मुसळे यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती अशी की, आंबोली घाट धोकादायक बनत असल्याने त्या ठिकाणावरून अवजड वाहतूक करण्यात येवू नये, असे आदेश प्रशासनाकडुन देण्यात आले होते. मात्र त्या आदेशाची अंमलबजावणी होत नव्हती, परिणामी अवजड वाहतूक सुरू होती. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर मनसेच्या पदाधिकार्‍यांनी त्या ठिकाणी रात्री जाऊन महसूल पोलिस आणि आरटीओ यंत्रणेचा पर्दाफाश केला होता. त्यानंतर तिघांच्या संयुक्त पथकाकडुन ही कारवाई करण्यात आली होती.