बांदा येथे राज्यस्तरीय शाळा पूर्व तयारी अभियान मेळावा २७ एप्रिलला…

12
2
Google search engine
Google search engine

सावंतवाडी,ता.२५: शिक्षणाचा खरा पाया बालवयातच मजबूत केला गेला पाहिजे. यामुळे पुढच्या शिक्षणाची प्रक्रिया सहज आणि सोपी होते. शाळेत पहिल्यांदाच येणार्‍या मुलांमध्ये शिकण्याची आवड निर्माण व्हावी. या विचाराने महाराष्ट्रात ‘पहिले पाऊल शाळापूर्व तयारी अभियान’ राज्यसरकारने हाती घेतले आहे. या स्तरावर शाळा पूर्वतयारी अभियान राज्यस्तरीय मेळावा सावंतवाडी तालुक्यातील बांदा जिल्हा परिषद शाळा नंबर १ या ठिकाणी गुरुवारी २७ एप्रिलला आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यास राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा विभाग मंत्री दीपक केसरकर हे उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यामध्ये शाळा पूर्वतयारी बाबत मार्गदर्शन केले जाणार आहे तरी शाळा पूर्व मेळावा उद्घाटनासाठी शिक्षक पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन अशोक रा. दळवी, शिवसेना जिल्हाप्रमुख सिंधुदुर्ग यांनी केले आहे.