भावनिक होवू नका, काहीही झाले तरी शरद पवार निर्णय मागे घेणार नाहीत…

4
2
Google search engine
Google search engine

अजित पवारांचा वेगळा सूर; सुप्रिया तू मध्ये बोलू नको, बहिणीला खडसावले…

मुंबई,ता.०२: काहीही झाले तरी पक्षाचे नेते शरद पवार यांनी घेतलेला निर्णय ते मागे घेणार नाही. वाढत्या वयामुळे ते हा निर्णय घेत आहेत. ते पक्षाध्यक्ष पदावर नसले तरी ते पक्षासाठी काम करणार आहेत. त्यामुळे कोणी भावनिक होवू नका, त्याठिकाणी अन्य एखाद्या व्यक्तीकडे पक्षाची जबाबदारी दिली जाईल, असे परखड मत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आज येथे मांडले. दरम्यान त्यांनी मत मांडल्यानंतर सुध्दा शरद पवार हेच पक्षाध्यक्षपदी पाहिजेत, अशी मागणी सर्वांनी लावून धरली. विशेष म्हणजे यावेळी मध्येच बोलणार्‍या खासदार सुप्रिया सुळे यांना एकेरी शब्दात “सुप्रिया मध्ये बोलू नको” असे अजित पवार यांनी सांगितले. त्यानंतर आपण बहीण म्हणून एकेरी बोललो, असे सांगून त्यांनी वेळ मारून नेली. परंतु राजकीय खळबळ उडालेली असताना अजित पवार यांना वेगळा सुर पहावयास मिळाला. तर सर्व नेत्यांनी मात्र साहेबांनी आपला निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी लावून धरली.