मुंबई-गोवा महामार्गावर लग्नाचे वऱ्हाड घेऊन परतणारा टेम्पो पलटला..

8
2
Google search engine
Google search engine

वागदे येथील घटना; २५ जण गंभीर, उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू…

कणकवली, ता. ०२ : मुंबई गोवा महामार्गावर वागदे तेथील हॉटेल वक्रतुंडसमोर बोलेरो पिकअप मधून लग्नाचे वऱ्हाड घेऊन देवगडच्या दिशेने जाणारा बोलेरो पिकप टेम्पो पलटी होत भीषण अपघात झाला. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात जवळपास २५ अधिकजण जखमी झाले असून काही जण गंभीर जखमी झाले आहेत. देवगड पाडगाव च्या दिशेने जाणारे हे लग्नाचे वऱ्हाड घेऊन जात असताना पिकप चालकाने डिव्हायडरवर पिकप गाडी चढवल्याने महामार्गावर पिकअप टेम्पो पलटी झाला. यात अनेकांच्या डोके, हाताला गंभीर दुखापत झाली असून घटनेची माहिती मिळतात महामार्गावरून जाणाऱ्या राजा पाटकर यांच्यासह वागदे सरपंच संदीप सावंत, यांनी जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. भाजपा शहराध्यक्ष अण्णा कोदे, माजी जि प उपाध्यक्ष रंजन राणे, हृतिक नलावडे, यांच्यासह अनेकांनी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली. अनेक अनेकांना गंभीर इजा झाली असून रक्तबंबाळ अवस्थेत प्रवाशांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.