ओवळीये खुनातील संशयिताने कबुली न दिल्याने पोलिसांसमोर पेच…

11
2
Google search engine
Google search engine

आणखी काहींची चौकशी; अन्य पुराव्याच्या शोधात सावंतवाडी पोलीस…

सावंतवाडी,ता.०३: ओवळिये येथील लवू रामा सावंत यांचा खून केल्याप्रकरणी पोलिसांनी त्याच्या सख्ख्या भावाला ताब्यात घेतले आहे. परंतु अद्याप पर्यंत त्याने कबुली दिली नसल्यामुळे पोलिसांसमोर पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे रासायनिक पुरावे तसेच काॅल डिटेल्स या द्वारे या खून प्रकरणाचा उलगडा करण्याच्या मागे असून पुराव्याचा शोध घेत आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आज आणखी काही जणांची चौकशी केली आहे. ओवळीये येथे माजी उपसरपंच लवू सावंत यांचा त्याच्याच सख्या भावाने खून केल्याचे पोलीस तपासात पुढे आल्यानंतर पोलीसांनी संशयिताला ताब्यात घेत अटक केली. या अटकेनंतर आरोपीने पोलीसापुढे नकार घंटा लावली असून पुढील तपास कसा करायचा असा पेच पोलीस यंत्रणे समोर आहे. पोलीसांनी लवू सावंत यांच्या भावा कडून रक्ताळलेले टोपी तसेच काही कपडे जप्त केले आहेत. या वस्तू पोलीस रासायनिक तपासाठी रत्नागिरी येथे पाठवणार असून त्याचा अहवाल काय येणार या वर तपासाची पूर्ण दिशा ठरणार आहे.
दरम्यान लवू सावंत याच्यावर दगड घालण्यात आला. त्या दगडावर त्याचा भाऊ अजित सावंत यांचे ठसे असल्याने पोलीस ही चक्रावून गेले आहेत. सर्व परिस्थितीजन्य पुरावे हे संशयिता विरोधात जात असले तरी खून करण्या मागचे कारण उलगडण्यात अद्याप पोलीसांना यश येत नाही. तसेच गावात ही या कुटूंबा बाबत चांगले वातावरण असून भावाचा खून हा भाऊ करूच शकत नाही, असा दावा अनेकांकडून पोलिसांकडे करण्यात आला आहे. तरीही पोलीस गावातील काही जणांना आणून चौकशी करत आहेत. तसेच लवू सावंत यांचे तसेच त्याच्या कुटुंबाचे कोणाशी वाद होते का? याचा ही पोलीस शोध घेतला दिसत आहेत.