सिंधुदुर्ग किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक व्हावे…

13
2
Google search engine
Google search engine

विशाल परबांची मागणी; लवकरच सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणार, मुख्यमंत्र्यांनी दिला शब्द…

सावंतवाडी,ता.०६: शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्यात यावा, अशी मागणी विशाल सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष तथा युवा उद्योजक विशाल परब यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. दरम्यान आंजिवडे-पाटगाव रस्ता लवकरात लवकर होण्यासाठी योग्य त्या सुचना द्याव्यात, अशी मागणी यावेळी त्यांनी केली. तसेच सिंधुदुर्ग दौर्‍यावर येण्याचे आवाहन केले. यावेळी आपण लवकरच सिंधुदुर्गात येवू, असे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. श्री. परब यांनी नुकतीच मुंबई येथे जावून मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली.
तळकोकणातील ह्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वर्षभरात पर्यटक येत असतात. यामुळे ह्या जिल्ह्यातील मंजूर झालेला सी-वर्ल्ड प्रकल्प तात्काळ व्हावा, अशी मागणी विशाल परब यांनी केली आहे. कोकणातील बोंडू मोठ्या प्रमाणात गोव्यात जातो. ह्या बोंडूवर प्रक्रिया करून वाईन निर्माण करणारी वायनरी आरोंदा-शिरोडा सारख्या भागात व्हावी. तसेच यावर्षी आंब्याचे पीक फक्त २०% असल्याने शेतकरी व बागायतदार चिंतेत सापडला आहे. यामुळे कोकणातील शेतकरांना तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी विशाल परब यांनी केली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातून घाटमाथ्यावर जाणार ऐकमेव जवळचा मार्ग असलेला आंजिवडा घाट लवकर फोडून झाराप-माणगाव दुकानवाड आंजिवडे पाट गावागावातील कोल्हापूर मार्ग सुरू करण्याची मागणीही विशाल परब यांनी आपल्या निवेदनातून केली आहे. त्यासंदर्भातही मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन यावर सविस्तर चर्चा केली. मुख्यमंत्र्यांनीही सर्व निवेदन वाचून संबंधित विभागांना तात्काळ सुचना दिल्या आहेत. तर लवकरच कोकणचा दौरा करण्याची विनंती विशाल परब यांनी यावेळी केली.