रानबांबुळी येथे आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद…

15
2
Google search engine
Google search engine

सिंधुदुर्गनगरी,ता.०६: रक्तदान श्रेष्ठदान हा हेतू समोर ठेवून छत्रपती प्रतिष्ठान युवा मंडळ रानबांबुळी च्यावतीने रानबांबुळी प्राथमिक शाळा नंबर १ येथे आयोजित रक्तदान शिबिरात ५५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
छत्रपती प्रतिष्ठान युवा मंडळ रानबांबुळी हे मंडळ नेहमीच विविध समाजोपयोगी उपक्रम राबवित असते. यावेळी या मंडळाने रानबांबुळी प्राथमिक शाळा नंबर १ येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन सरपंच परशुराम परब यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी उपसरपंच सुभाष बांबुळकर, छत्रपती प्रतिष्ठान युवा मंडळ रानबांबुळीचे अध्यक्ष शुभम परब आदी उपस्थित होते. या रक्तदान शिबिराला रक्तदात्यांकडून चांगला प्रतिसाद लाभला. या शिबिरात एकूण ५५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.