सावंतवाडीत ११ ते २१ या काळात सावंतवाडी महोत्सवाचे आयोजन…

10
2
Google search engine
Google search engine

कोकण नाऊचा पुढाकार; स्टॉलबरोबर आनंदमेळा ऑटो एक्सप्रो प्रदर्शनाची पर्वणी…

सावंतवाडी,ता.०६: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील “कोकण नाऊ” या चॅनलच्या माध्यमातून सावंतवाडी येथील जिमखाना मैदानावर ११ ते २१ मे या कालावधीत सावंतवाडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात विविध फुड तसेच, अन्य स्टॉलबरोबर आनंदमेळा तसेच, ऑटो एक्सप्रो प्रदर्शनाचा लाभ प्रेक्षक व ग्राहकांना घेता येणार आहे. यात तब्बल दोनशेहून अधिक स्टाॅल असणार आहेत तर, विविध सांस्कृतिक व मनोरंजनाच्या कार्यक्रमांसोबत महिलांसाठी खेळ पैठणी तसेच, अन्य स्पर्धा ही घेण्यात येणार आहे. याबाबतची माहिती संचालक विकास गावकर यांनी दिली. यावेळी मयूर ठाकूर, रामचंद्र कुडाळकर आदी उपस्थित होते.

त्याचप्रमाणे विविध प्रकारच्या गृहपयोगी वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्री या महोत्सवात होणार आहेत. तसेच देश-परदेशीय खाद्यपदार्थांची प्रदर्शन तसेच विक्री देखील या महोत्सवाचं आकर्षण ठरेल. या महोत्सवात लहानांपासून मोठ्यांपर्यंत मनोरंजनासाठी “मनोरंजन नगरी” या उपक्रमाचे आयोजन करण्यात आलेल आहे. तसेच विविध प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल देखील या पर्यटन महोत्सवामध्ये अर्थातच “कोकण नाऊ सावंतवाडी महोत्सव २०२३” मध्ये असणार आहे. यामध्ये रेकॉर्ड डान्स स्पर्धा, सिंधुदुर्गातील गायक स्पर्धकांसाठी “आवाज सिंधुदुर्गचा” ही गायन स्पर्धा, तसेच ब्युटी कॉन्टेस्ट साठी “मिस सिंधुदुर्ग स्पर्धा”, शहरातील डान्स अकॅडमीचे सांस्कृतिक कार्यक्रम तसेच ऑर्केस्ट्रा व विशेष म्हणजे तालुक्यातील विविध लोक कलाकारांना देखील कोकण नाऊच्या व्यासपीठावरती आपले सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्याची संधी या माध्यमातून निर्माण होणार आहे.