सावंतवाडीत राष्ट्रवादीकडून फटाके फोडून आनंद साजरा…

6
2
Google search engine
Google search engine

पवारांच्या राजीनाम्याचा निर्णय मागे; कार्यकर्त्यांकडून आनंदोत्सव…

सावंतवाडी,ता.०६: राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या राजीनाम्याचा निर्णय मागे घेतल्यानंतर सावंतवाडी राष्ट्रवादीच्या माध्यमातून फटाके फोडून आनंद उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी येथील कार्यालयाच्या परिसरात पेढे वाटप करण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोकण विभागाचे अध्यक्ष सौ. अर्चना घारे-परब, सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, वेंगुर्ला तालुकाध्यक्ष योगेश कुबल, सावंतवाडी शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर, महिला शहराध्यक्ष सौ. सायली दुभाषी, रत्नागिरी निरीक्षक सौ. दर्शना बाबर-देसाई, उद्योग व्यापार कार्याध्यक्ष हिदायतुल्ला खान, याकूब शेख, राकेश नेवगी, काशिनाथ दुभाषी, जावेद शेख, बावतीस फर्नांडिस, आसिफ ख्वाजा, सौ. पूजा दळवी, चराठा ग्रामपंचायत सदस्य गौरी गावडे, सौ. मारिता फर्नांडिस आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.