आंबेगावला भेडसावणारे वनसंज्ञा आकारीपड प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करू….

15
2
Google search engine
Google search engine

पालकमंत्र्यांची ग्वाही; गावातील म्हारकाटेवाडी मधलीवाडी रस्त्याचे भूमिपुजन…

सावंतवाडी,ता.०७: आंबेगावच्या विकासासाठी प्रयत्न केले जातील, वनसंज्ञा तसेच आकारीपड सारखे प्रश्न सोडविले जातील, अशी ग्वाही पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी येथे दिली. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर करण्यात आलेल्या म्हारकाटेवाडी-मधलीवाडी या रस्त्याचे भूमिपुजन काल करण्यात आले. यावेळी श्री. चव्हाण बोलत होते.

यावेळी जिल्हा बॅक संचालक महेश सारंग, सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष मनोज नाईक, भाजपा आंबोली मंडळ अध्यक्ष रवी मडगावकर, उपाध्यक्ष अशोक माळकर, तहसिलदार विलास उंडे, नायब तहसिलदार विजय वरक, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, सहाय्यक गटविकास अधिकारी प्रशांत चव्हाण, माजी सभापती प्रमोद सावंत, आंबेगाव सरपंच शिवाजी परब, उपसरपंच रमेश गावडे, कोलगाव उपसरपंच दिनेश सारंग, माजी सरपंच संदीप हळदणकर, कुणकेरी सरपंच सोनिया सावंत, उपसरपंच सुनिल परब, कारिवडे सरपंच अक्षता माळकर आदी मान्यवर उपस्थित होते.

आंबेगाव येथील म्हारकाटेवाडी ते मधलीवाडी या तीन किलोमीटर लांबीच्या रस्त्याचा प्रश्न अनेक वर्ष प्रलंबित होता. याबाबत जिल्हा बँक संचालक महेश सारंग यांनी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचे लक्ष वेधताच त्यांनी अवघ्या तीन महिन्यात या रस्त्याला मंजूरी देत यासाठी तब्बल २ कोटी ५३ लाख रुपये मंजूर केले. त्यामुळे म्हारकाटेवाडी आणि मधलीवाडी रहिवाशांची रस्त्याअभावी होणारी गैरसोय दूर झाली असून या ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.यावेळी माजी सरपंच वर्षा वरक, तलाठी श्री. धोंड, ग्रामसेवक अमित राऊळ, ग्रामपंचायत सदस्य योगेश गवळी, साक्षी राउळ, आनंदी मुळीक, बुथ अध्यक्ष संतोष राणे, ज्ञानेश्वर परब, नामदेव परब, अण्णा केळुस्कर, दीपक बर्वे, यशवंत आंगचेकर, जयराम गोसावी, तुकाराम राऊळ, संजू गावडे, रवि गावडे, भावाशी कुंभार, भाजपा शक्ति केंद्रप्रमुख आनंद तळवणेकर, पोलीस पाटील प्रदीप केळुसकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच शिवाजी उर्फ संजू परब यांनी सूत्रसंचालन भाजपा शक्ती केंद्रप्रमुख योगेश गवळी यांनी तर आभार देवस्थान कमिटी अध्यक्ष ज्ञानेश्वर परब यांनी मानले