वरवडे फणसनगर येथे कार वीज खांबाला आदळली

13
2
Google search engine
Google search engine

कारचे मोठे नुकसान : सुदैवाने चालक बचावला

 

कणकवली, ता. ०८ : कणकवली आचरा मार्गावर आज कार वीज खांबावर आदळून अपघात झाला. यात चालक सुदैवाने बचावला तर कारचे मोठे नुकसान झाले. दुपारी साडेतीन च्या सुमारास ही घटना घडली.
काका केसरकर आपल्या एक्स यू व्ही 300 कारमधून आचरा ते कणकवली च्या दिशेने येत होते. फणसनगर येथे कार आली असता चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार रस्त्याच्या विरुद्ध दिशेने जात विजपोलला आदळली. अपघात घडल्यानंतर कारचा चालकाच्या दिशेकडील टायर फुटला. कारच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले. मात्र कारचालक तसेच काका केसरकर यांना कोणतीही दुखापत झाली नाही.