शिंदे-फडणवीस सरकार वाचलं, एकनाथ शिंदेना दिलासा…

10
Mumbai: Shiv Sena chief Uddhav Thackeray (R) and State PWD minister Eknath Shinde during a press conference in Mumbai on Saturday. PTI Photo by Mitesh Bhuvad(PTI7_15_2017_000089B)
2
Google search engine
Google search engine

सुप्रीम कोर्टाचा निर्णय; अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे…

मुंबई,ता.११: शिंदे-फडणवीस सरकारला अखेर सुप्रीम कोर्टाने हिरवा कंदिल दिला आहे. त्यामुळे हे सरकार अखेर वाचलं आहे. दुसरीकडे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर त्यांना आम्ही पून:प्रस्थापित करू शकलो असतो, असे न्यायालयाच्या खंडपीठाने म्हटले आहे. तर त्या अपात्र १६ आमदारांबाबत विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घ्यावा, असे त्यांनी म्हटले आहे.

यावेळी सुप्रीम कोर्टाने शिंदे गटाच्या सर्व कृतीवर ताशेरे ओढले आहेत. राज्यपालांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली तसेच सुनील प्रभू यांनी बजावलेला व्हीप कायदेशीर असल्याचे म्हटले आहे. मात्र कोर्टाला सरकारला तूर्तास दिलासा दिला आहे.