…अन्यथा लोक वर्गणीतून धोकादायक गटारावर झाकणे बसवू…

16
2
Google search engine
Google search engine

सामाजिक बांधिलकी; सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना इशारा…

सावंतवाडी,ता.२३: येथील वेंगुर्ला बस स्टँड समोरील धोकादायक वळणावरील गटारे उघडी असल्याने अपघात घडत आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी तात्काळ झाकणे बसवा, अन्यथा सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून लोक वर्गणी काढून झाकणे बसवण्यात येतील, असा इशारा आज सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आला. याबाबतचे निवेदन सामाजिक बांधिलकीचे अध्यक्ष रवी जाधव यांच्या उपस्थितीत देण्यात आले.