गडहिंग्लजच्या “कोटा अकॅडमी”ची सेवा आता सिंधुदुर्गात….

1
2
Google search engine
Google search engine

नीट, सीईटी, प्रवेश परिक्षांची दारे उघडी; इंजिनीअरिंग आणि मेडिकल प्रवेशाचा मार्ग सुकर…

सावंतवाडी,ता.३०: कोकणातीला मुलांना मेडीकल आणि इंजिनिअरींग क्षेत्रात सहज प्रवेश मिळावा यासाठी आवश्यक असलेल्या मार्गदर्शना बरोबर नीट, सीईटी, जेईई, आयआयटी सारख्या प्रवेश परिक्षांची तयारी करुन अगदी अत्यल्प फी मध्ये विद्यार्थ्यांच्या भविष्याची जबाबदारी घेण्याचा निर्णय गडहिंग्लज येथील “कोटा अकॅडमी”ने पुढाकार घेतला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना प्रवेश घेणे शक्य व्हावे यासाठी सावंतवाडी तुळजा कॉम्प्लेक्स येथे संपर्क केंद्र उभारण्यात आले आहे.

“कोटा अकॅडमी” या संस्थेच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांना अगदी सोप्या आणि सहज भाषेत तज्ञ शिक्षकांच्या माध्यमातून अन्य ठिकाणी १० लाखाहून अधिक किमतीचे शिक्षण काही लाखात देण्यात येणार आहे. त्यामुळे उद्याचे विद्यार्थी घडण्यास मदत होणार आहे, असा विश्वास संस्थेचे मुख्य समन्वयक विलास पोळ यांनी व्यक्त केले आहे. कोल्हापुर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यात गेली अनेक वर्षे कार्यरत असलेल्या कोटा अकॅडमीला शैक्षणिक इतिहास आहे. या ठिकाणी गेल्या अनेक वर्षात अनेक विद्यार्थी घडले आहेत. त्यांना जीवनात यशस्वी करण्यासाठी संस्थेच्या माध्यमातून प्रयत्न सुररू आहे. “आम्ही साकारतो तुमचे भविष्य” हे ब्रीद वाक्य घेवून संस्थेच्या माध्यमातून हा प्रयत्न सुरू आहे. विशेष म्हणजे या अंतर्गत मुलांना वैद्यकीय तसेच इंजिनिअरींग प्रवेशासाठी लागणार्‍या सारख्या सर्व परिक्षा या ठिकाणी देता येणार आहेत. त्या दृष्टीने आवश्यक ते तज्ञ प्राचार्य, वर्ग आणी आवश्यक त्या सुखसोई उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. जास्तीत जास्त विद्यार्थी कोटा अकॅडमीच्या माध्यमातून घडावेत हा या मागचा उद्देश्य आहे. विशेष करुन कोकणातील मुलांना सुध्दा आता या ठिकाणी सहज प्रवेश घेता यावा यासाठी सावंतवाडीत संपर्क केंद्र उभारण्यात आले आहे. त्यामुळे दहावी-बारावी झालेल्या मुलांच्या पालकांनी या केंद्राला भेट देण्याबरोबर कोटा अकॅडमीत आपल्या मुलांचा प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन संस्थेच्या माध्यमातून करण्यात आले आहे. तसेच सावंतवाडी तुळजा कॉम्प्लेक्स, फ्लॅट नं. १०३, मारुती मंदिर शेजारी, मिलाग्रीस रोड, सालईवाडा येथील संपर्क केंद्राला भेट द्या, किंवा अधिक माहितीसाठी ७९९६९९६५५५ / ८०८७२३०४१४ / ७०५७५२६५५७ / ७०३०९८७८२१ या नंबरवर संपर्क साधावा.