मळेवाड-कोंडूरे गावासाठी कायमस्वरूपी तलाठी द्या…

2
2
Google search engine
Google search engine

हेमंत मराठेंची मागणी; प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर यांना निवेदन…

सावंतवाडी,ता.३०: मळेवाड-कोंडूरे गावासाठी कायमस्वरूपी तलाठी द्यावा, अशी मागणी मळेवाड-कोंडूरे उपसरपंच हेमंत मराठे यांनी केली आहे. मळेवाड-कोंडुरे गावासाठी गेली दीड वर्षेहून अधिक काळ कायमस्वरूपी तलाठी नसल्याने या ठिकाणी शेतकरी, विद्यार्थी व जमीनदार यांना त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे मळेवाड-कोंडुरे गावासाठी लवकरात लवकर कायमस्वरूपी तलाठी नियुक्त करावा, अशी मागणी सावंतवाडी प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर यांच्याकडे मळेवाड-कोंडुरे उपसरपंच हेमंत मराठे यांनी निवेदन देऊन केली आहे. मागणीचा गांभीर्याने विचार करावा, अन्यथा आपल्या कार्यालयासमोर ग्रामस्थ व शेतकऱ्यांसमवेत उपोषण छेडण्यात येईल, असाही इशारा मराठे प्रांताधिकारी यांना दिला आहे.