कुडाळातील २३ देवस्थानांचा पर्यटनदृष्ट्या विकास होणार…

16
2
Google search engine
Google search engine

पर्यटन संचलनालयाकडून चाचपणी; निलेश राणेंच्या पाठपुराव्याला यश…

ओरोस,ता.३०: कुडाळ तालुक्यातील २३ देवस्थानच्या परिसरांचा आता पर्यटनदृष्ट्या विकास होणार आहे. त्यासाठी संबंधित देवस्थानांचा विकास आराखडा बनवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. याबाबत भाजपचे युवा नेते तथा माजी खासदार निलेश राणे यांनी पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडे मागणी केली आहे. त्यानुसार प्रादेशिक पर्यटन संचालनाच्या वतीने तालुक्यातील देवस्थानचा विकास आराखडा व अंदाजपत्रक तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

यात श्री देव कुडाळेश्वर मंदिर कुडाळ, श्री देव रवळनाथ मंदिर ओरोस बुद्रुक, श्री सिद्ध महादेव मंदिर केरवडे कर्याड नारूर, श्री लिंग रवळनाथ मंदिर पोखरण, देवी भगवती मंदिर आंब्रड, श्री देव गिरोबा मंदिर भडगाव, श्री देवी भराडी मंदिर वाडीवरवडे, श्री देवी भावई मंदिर गोठोस, श्री देव जटाशंकर मंदिर मंदिर नेरूर कर्याद नारूर, श्री देव लक्ष्मी नारायण मंदिर वालावल, श्री देव स्वयंभू महादेव मंदिर पांग्रड, श्री देव कलेश्वर मंदिर नेरूर इत्यादी देवस्थान परिसरांचा विकास पहिल्या टप्यात होणार आहे.