कणकवलीत पावसाची सलामी…

3
2
Google search engine
Google search engine

हवेतील गारव्याने दिलासा; वीज पुरवठा काही काळ खंडित…

कणकवली, ता.३० : वादळी वारे आणि मेघगर्जनेसह पहिल्‍या पावसाने कणकवलीत सलामी दिली. सुमारे पंधरा मिनिटे जोरदार पाऊस झाला. या कालावधीत वीज पुरवठाही ठप्प झाला होता. अाजच्या पावसाने वातावरणातही गारवा निर्माण झाल्‍याने नागरिकांना दिलासा मिळाला.
दुपारी तीन वाजल्‍यापासून ढगांची दाटी झाल्‍याने सायंकाळी पाऊस पडण्याची शक्‍यता व्यक्त केली जात होती. सायंकाळी चारच्या सुमारास जोरदार वादळी वाऱ्यांसह पावसाच्या सरी कोसळल्‍या. या पहिल्‍याच पावसात बच्चे कंपनींनी भिजण्याचा आनंद लुटला. अचानक कोसळलेल्‍या सरींनी हवेत गारवा निर्माण केला. हवामान विभागाने आज आणि उद्या मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज व्यक्‍त केला होता.