पंतप्रधान मोदींमुळे देशाची महासत्तेच्या दिशेने वाटचाल…

13
2
Google search engine
Google search engine

नीतेश राणे;  केंद्र सरकारच्या ९ वर्षपूर्तीनिमित्त जनसंपर्क अभियान…

कणकवली,ता. ३१ ः पंतप्रधान मोदी सरकारच्या नऊ वर्षाच्या कालखंडामध्ये देश महासत्तेच्या दिशेने पुढे जात आहे. ‘सबका साथ सबका विकास’ हे घोषवाक्य घेऊन मोदी सरकार शेवटच्या घटकापर्यंत पोचण्यात यशस्वी ठरले आहे. मोदी सरकारच्या ९ वर्ष पूर्तीनिमित्त ३० मे ते ३० जून या कालावधीत जनसंपर्क अभियान राबवले जात असल्‍याची माहिती आमदार नीतेश राणे यांनी आज येथे दिली. जनसंपर्क अभियानाच्या निमित्ताने केंद्र सरकारने केलेल्या विकास योजना आणि वैयक्तिक लाभाच्या योजना घरोघरी पोहोचवल्या जाणार आहेत असल्‍याचेही ते म्‍हणाले.
येथील प्रहार भवन येथे श्री.राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी माजी खासदार तथा भाजप नेते निलेश राणे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष तथा भाजप प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, महिला मोर्चाच्या जिल्हा अध्यक्ष संध्या तेरसे, भाजप संघटक मंत्री प्रभाकर सावंत, माजी सभापती मनोज रावराणे, मिलिंद मेस्त्री, आनंद शिरवलकर आदी उपस्थित होते.
आमदार राणे म्हणाले, केंद्र सरकारच्या २०१४ ते २०२३ हा देशाचा सुवर्णकाळ अाहे. मोदींच्या नेतृत्वाखाली विकासाची घौडदौड सुरू ठेवली. प्रगतीच्या दिशेने निर्णय घेतले गेले. गरीब कल्याणच्या दिशेने देशाची वाटचाल सुरू आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली देशाची वेगळी ओळख जगभरात निर्माण झाली. यापूर्वीचे सरकार भ्रष्टाचाराने बरबटलेले होते. त्यामुळे देशाची भ्रष्ट देशांमध्ये नोंद होती. तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांना स्वातंत्र्य नव्हते. त्यामुळे १४० कोटी जनतेने नरेंद्र मोदी यांच्या हातामध्ये देशाची सत्ता दिली. या सत्तेच्या काळात प्रत्येक घटकाला मोदींनी न्याय देण्याचा प्रयत्न केला. शेतकरी सन्मान योजना आणली. नागरिकांच्या थेट खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत. मच्छिमारांसाठी ही वेगवेगळ्या योजना, मुंबई गोवा महामार्गाचे चौपदरीकरण होत आहे. कोकण रेल्वेचा ही विकास होत आहे. पंतप्रधान आवास योजना देशभरातील लाभार्थींना हक्काचे घर मिळाले. जनजीवन मिशन योजनेअंतर्गत प्रत्येक घरात नळाचे पाणी पोहोचत आहे. सबका साथ सबका विकास हे घोषवाक्य घेऊन धार्मिक स्थळांचा ही विकास केला जात आहे. म्हणून मोदींनी सांगितले होते ना खाऊंगा ना खाने दूंगा भ्रष्टाचार नष्ट करून देशाची प्रतिमा बदलली आहे. ग्रामीण भागाबरोबरच शहरात स्मार्ट सिटी ही संकल्पना राबवली. रेल्वेच्या प्रगतीने विकास झाला. वंदे भारत ही जगभरात वेगळी ओळख असणारी ट्रेन देशात धावू लागली. मेट्रोचे झाळे शहरात पसरत आहे. त्यामुळे येत्या २०२४ मध्ये केंद्राची सत्ता भाजपच्या हाती राहणार असून फिर एक बार मोदी सरकार येणार हे निश्‍चित आहे.