मोबाईल चोरी प्रकरणी एक आरोपी कणकवली पोलिसांच्या ताब्‍यात…

21
2
Google search engine
Google search engine

विलवडे चोरी प्रकरणात सहभागाची शक्‍यता; बांदा येथून संशयित ताब्‍यात…

कणकवली, ता.०९ : कणकवली शहरातील एकाचा मोबाईल चोरी केल्‍या प्रकरणी एका संशयिताला स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने बांदा येथून ताब्‍यात घेतले आहे.
परशुराम आनंद धोत्रे (वय २३, ओसरगाव) असे त्याचे नाव आहे. विलवडे येथील पत्रकार अजित दळवी घरफोडी प्रकरणी तपास सुरू असताना संशयित परशुराम धोत्रे याने कणकवलीतील मोबाईल चोरी केल्‍याची बाब उघड झाली होती. त्‍यामुळे त्‍याला आज कणकवली पोलिसांच्या ताब्‍यात देण्यात आले.
दरम्‍यान संशयित परशुराम धोत्रे हा कामानिमित्त अनेक महिने बांदा बाजारपेठ परिसरात राहत होता. विलवडे घरफोडी प्रमाणेच त्‍याने बांदा शहरातील घरफोडी प्रकरणांमध्ये त्‍याचा सहभाग असावा असा पोलिसांचा संशय असून त्‍यादृष्‍टीने पोलीस तपास सुरू आहे.अशी माहिती बांदा पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल जाधव यांनी दिली