दशावतार कोकणचा ध्यास, श्वास आणि अभिमान…

17
2
Google search engine
Google search engine

अर्चना घारे; दोडामार्गात कलाकारांशी चर्चा, सहकार्याची ग्वाही..

दोडामार्ग,ता.११: दशावतार कला कोकणाचा ध्यास, श्वास आणि अभिमान आहे. दशावतार कलाकारांनी या कलेचा वारसा जपला आहे. कला वाखाणण्याजोगी आणि अभिमानास्पद आहे. त्यामुळे येत्या काळात दशावतारी कलाकारांना राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराकडून लागेल ते सहकार्य केले जाईल अशी, ग्वाही राष्ट्रवादीच्या कोकण विभाग महिला अध्यक्ष अर्चना घारे-परब यांनी येथे दिली. त्यांनी रविवारी तालुक्यातील दशावतारी कलाकारांची भेट घेतली.

त्या म्हणाल्या, रात्री राजाची भूमिका करणाऱ्या कलाकाराला दिवसा कठीण परिस्थितीचा सामना करावा लागतो. अत्यल्प मानधन मिळाले तरी अपार कष्ट करुन सर्व कलाकार समर्पित भावनेने कला जोपासत आहेत. रसिक प्रेक्षकांची त्यांना दाद मिळत आहे; पण शासनाच्या योजनांचा त्यांना योग्य लाभ मिळत नाही.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रदीप चांदेलकर, जिल्हा उपाध्यक्ष संदीप गवस, दोडामार्ग शहर अध्यक्ष सुदेश तुळसकर, दशावतार कलाकार समितीचे अध्यक्ष सुभाष लोंढे, उपाध्यक्ष विलास गवस, सचिव शंकर जाधव, सल्लागार कृष्णा नाईक, खजिनदार राजेंद्र बांदेकर, सदस्य कृष्णा कुंभार, अभिमन्यू बांदेकर, प्रकाश वर्णेकर, प्रभाकर गवस, विठ्ठल गावकर, नारायण खांबल, रत्नाकर गवस आदी उपस्थित


होते.