तुळस येथे १८ जूनला रक्तदान शिबीराचे आयोजन…

40
2
Google search engine
Google search engine

वेंगुर्ले,ता.१३: रक्तदान मासाच्या औचित्याने आणि सद्यस्थितीत जिल्ह्यात असणारी रक्ताची मागणी लक्षात घेता वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस कडून सलग २१ व्या रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरासाठी श्री सद्गुरुनाथ भजन मंडळ तुळस आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान शाखा वेंगुर्ला सहयोगी संस्था आहेत. रक्तपेढी सावंतवाडीच्या सहकार्याने श्रीमंत पार्वतीदेवी वाचनालय तुळस (श्री देव जैतिराश्रीत संस्था मुंबई चे बहुउददेशीय सभागृह) येथे रविवार १८ जून ला सकाळी ९.०० वाजता आयोजित केलेल्या या रक्तदान शिबरास जास्तीत-जास्त रक्तदात्यांनी उपस्थित राहून रक्तदान करून या ईश्वराधिष्ठित कार्यात सहभागी व्हावे आणि नाव नोंदणीसाठी महेश राऊळ (९४०५९३३९१२) यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन प्रतिष्ठान चे अध्यक्ष विवेक तिरोडकर आणि श्री सद्गुरुनाथ भजन मंडळ चे सिद्धेश नाईक यांनी केले आहे.