शिक्षक भरतीसाठी ठाकरे सेनेचे पंचायत समिती समोर आंदोलन…

4
2
Google search engine
Google search engine

जिल्‍हा परिषद शाळा बंद करण्याचा सरकारचा घाट असल्‍याचा आरोप…

कणकवली, ता.१५ : शून्य शिक्षकी शाळांवर तातडीने शिक्षक भरती करा या मागणीसाठी ठाकरे सेनेतर्फे आज आंदोलन करण्यात आले. पंचायत समिती कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करून सरकार विरोधात घोषणा देण्यात आल्‍या. तसेच आठ दिवसांत शिक्षक भरतीची कार्यवाही करण्याबाबतचे निवेदन गटविकास अधिकारी अरूण चव्हाण यांना देण्यात आले. शिक्षकांची पदे रिक्‍त ठेवून जिल्‍हा परिषदेच्या शाळा बंद करण्याचा घाट राज्‍य सरकारने आखला आहे असा आरोप यावेळी शिवसेना जिल्‍हा युवा संघटक सुशांत नाईक यांनी केला.
कणकवली शिवसेना कार्यालय ते पंचायत समितीपर्यंत शिवसेना कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी मोर्चा काढला. त्‍यानंतर तातडीने डी.एड. उमेदवारांची शिक्षण सेवक म्‍हणून भरती करा या मागणीचे निवेदन गटविकास अधिकारी अरूण चव्हाण यांना देण्यात आले. आजच्या आंदोलनात शिवसेना तालुकाप्रमुख शैलेश भोगले, नगरसेवक रूपशे नार्वेकर, कन्हैया पारकर यांच्यासह प्रमोद मसुरकर, तेजस राणे, सचिन आचरेकर, उत्तम लोके, सोहम वाळके, सचिन सावंत, रूपेश आमडोसकर, विराज गुडेकर, स्वरूपा विखाळे, दिव्या साळगावकर, निसार शेख, वैभव मालंडकर, धनश्री मेस्त्री, सिद्धेश राणे आदींनी सहभाग घेतला होता.