कुडाळ गटविकास अधिकाऱ्यांच्या विरोधात बेमुदत उपोषण….

18
2
Google search engine
Google search engine

शेगले कुटंब आक्रमक; घर दुरुस्तीचा प्रस्ताव गहाळ केल्याचा आरोप…

सिंधुदुर्गनगरी,ता‌.१९: शासनाच्या ड यादीत नाव असुनही नवीन घरकुलाच्या लाभापासून वंचित ठेवण्याऱ्या आणि घर दुरुस्तीचे प्रस्ताव गहाळ करून पडक्या घरात राहण्यास भाग पाडणाऱ्या कुडाळ गट विकास अधिकाऱ्यांच्या विरोधात मांडकुली येथील विजय शेगले व स्नेहांकिता शेगले यांनी आज पासून जिल्हा परिषद समोर बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे.
कुडाळ तालुक्यातील मांडकुली येथील विजय गंगाराम शेगले यांचे शासनाच्या २०१८ च्या सर्व्हेनुसर ड यादीत नाव आहे. त्यानुसार त्यांनी आपल्याला नवीन घरकुल मंजूर व्हावे यासाठी कुडाळ पंचायत समितीकडे प्रस्ताव केला होता. मात्र हा प्रस्ताव गट विकास अधिकारी यांनी नामंजूर केला. वारंवार मागणी करूनही नवीन घरकुल मंजूर केले जात नाही. त्यामुळे शेगले यांनी ९ ऑक्टोंबर २०१९ ते २२ मे २०२३ या कालावधीत गट विकास अधिकारी यांच्याकडे घर दुरुस्तीसाठी प्रस्ताव सादर केला. मात्र हे चारही प्रस्ताव गहाळ करण्यात आले. त्यामुळे नवीन घरकुल नाही आणि जुने घर पडके अशी परिस्थिती शेगले यांची आहे. त्यामुळे याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. मात्र प्रशासनाकडून दुर्लक्ष केला जात असल्याने आपल्याला नवीन घरकुल देण्यास टाळाटाळ करणाऱ्या आणि घर दुरुस्ती प्रस्ताव गहाळ करणाऱ्या कुडाळ गट विकास अधिकारी यांच्या कार्यपद्धती विरोधात विजय शेगले व त्यांची पत्नी स्नेहांकिता शेगले यांनी आजपासून जिल्हा परिषद भवनासमोर बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. या बाबतचे निवेदन त्यानी ग्रामपंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे याना सादर केले आहे. या निवेदनात त्यानी म्हटले आहे की,
नवीन घरकुल मिळणार नसल्याने नुकसान भरपाई ची रक्कम आपण नाकारली आहे.
तौक्ते वादळामुळे आपल्या घराचे नुकसान झाले पत्रे फुटले. त्यामुळे या नुकसानीची नुकसान भरपाई २० हजार रुपये मिळणार होते. मात्र ही नुकसान भरपाई स्वीकारल्यास नवीन घरकुल मंजूर होणार नसल्याचे गट विकास अधिकारी यांनी सांगितल्याने आपण ती नुकसान भरपाई नाकारली होती. असे विजय शेगले यांनी सांगितले. आता नविन घर ही नाही आणि पडलेल्या घराची नुकसान भरपाई ही नाही अशी अवस्था झाली आहे याला कुडाळ गटविकास अधिकारी जबाबदार आहेत तरी आपल्याला न्याय मिळावा म्हणून आज पासून जिल्हा परिषद समोर उपोषण सुरु केले आहे.