जामसंडेतील गोगटे माध्यमिक विद्या मंदिरात योग दिन साजरा…

18
2
Google search engine
Google search engine

देवगड,ता.२१: श्रीराम मोरेश्वर गोगटे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिर जामसंडे या प्रशालेमध्ये आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा आज संपूर्ण जगामध्ये आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा होत आहे . या निमित्ताने श्रीराम मोरेश्वर गोगटे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिर जामसंडे या प्रशालेमध्येही आजचा आंतरराष्ट्रीय योगदिन अगदी उत्साहात साजरा करण्यात आला. या दिनानिमित्त दिनेश खाडिलकर हे योग शिक्षक म्हणून लाभले. योगशिक्षक दिनेश खाडीलकर यांनी प्रशालेतील विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व आपल्या जीवनामध्ये काय आहे आणि योगामुळे आपलं मन आणि शरीर कसं सुदृढ होतं याचे महत्त्व अगदी सरळ व सोप्या सुंदर शब्दांमध्ये मुलांना समजावून सांगितले व मुलांकडून काही योगासने प्रात्यक्षिके करून घेतली व त्याचे आपल्या जीवनामध्ये काय महत्त्व आहे हे समजावून सांगितले.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि सरस्वती पूजनाने झाली यावेळी उपस्थित दिनेश खाडीलकर योगशिक्षक मनीषा जामसंडेकर सन्माननीय नगरसेविका देवगड जामसंडे नगरपंचायत आद्या गुमास्ते सन्माननीय नगरसेविका देवगड जामसंडे नगरपंचायत तसेच प्रशालेचे प्रभारी मुख्याध्यापक गोगटे सर तसेच प्रशालेचे जेष्ठ शिक्षक जाधव सर आदी मान्यवर मंडळी व्यासपीठावर उपस्थित होती. या सर्वांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन आणि सरस्वती पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात. उपस्थित मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन प्रशालेचे प्रभारी मुख्याध्यापक गोगटे सर यांनी स्वागत केले आणि मान्यवरांचा थोडक्यात परिचय करून दिला. यावेळी प्रशालेचे सर्व विद्यार्थी या योग वर्गाला उपस्थित होते .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेचे शिक्षक पांचाळ सर यांनी केले तर कार्यक्रमाची प्रस्ताविक प्रशालेचे प्रभारी मुख्याध्यापक गोगटे सर यांनी केले तर या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रशालेचे ज्येष्ठ शिक्षक श्री जाधव सर यांनी केले. अशाप्रकारे आजचा आंतरराष्ट्रीय योगदिन हा प्रशालेमध्ये साजरा करण्यात आला.