आचरा ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या आरक्षणाची सोडत जाहीर…

44
2
Google search engine
Google search engine

आचरा, ता. २१ : आचरा ग्रामपंचायत मध्ये आज झालेल्या विशेष ग्रामसभेत आगामी काळात होणाऱ्या आचरा ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या आरक्षणाची सोडत प्रभाग रचनेनुसार जाहीर करण्यात आली. शाळकरी मुलीकडून चिठ्या काढून ही सोडत जाहिर करण्यात आली.
आचरा ग्रामपंचायतची मुदत २० एप्रिल रोजी संपली होती. त्यानंतर ग्रामपंचायतीचा कारभार प्रशासकाच्या हाती गेला होता. आज आचरा ग्रामपंचायत येथे विशेष ग्रामसभेचे आयोजन निवडून निर्णय अधिकारी म्हणुन विस्तार अधिकारी आर. जी. कांबळे यांच्या अध्य्षतेखाली ग्रामसभा घेण्यात आली. यावेळी प्रशासक विनायक जाधव, पी. जी. कदम, माजी सरपंच मंगेश टेमकर, अरुण आपकर, जगदीश पांगे, जयप्रकाश परूळेकर, सचिन हडकर, विद्यानंद परब, नितीन घाडी, पंकज आचरेकर, अनुष्का गावकर, राजू परब, रुपेश हडकर व अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.
तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायतपैकी आचरा ग्रामपंचायतमध्ये सरपंच व १३ सदस्य संख्या आहे. होणाऱ्या निवडणुकीसाठी आचरा गावातील प्रभागाची संख्या ५ असून या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या आरक्षणाची सोडत आज जाहीर झाली. त्यामध्ये प्रभाग एक- (हिर्लेवाडी, पिरावाडी) तीन जागांसाठी नामप्र स्त्री १, नामप्र पुरुष १, सर्वसाधारण स्त्री १, प्रभाग दोन- (जामडूल गाऊडवाडी, काझीवाडा शेखवाडा, डोंगरेवाडी) तीन जागांसाठी सर्वसाधारण २, सर्वसाधारण स्त्री १,
प्रभाग तीन- (पारवाडी) दोन जागांसाठी नामप्र स्त्री १, सर्वसाधारण स्त्री १, प्रभाग चार- (मेस्त्रीवाडी, देऊळवाडी, बाजार, बौद्धवाडी) दोन जागांसाठी सर्वसाधारण १, सर्वसाधारण स्त्री १, प्रभाग पाच- (वरचीवाडी, भंडारवाडी
नागोचीवाडी) तीन जागांसाठी सर्वसाधारण २, सर्वसाधारण स्त्री १ अशी सोडत ग्रामसभेत जाहीर करण्यात आली आहे.
सोडतीनंतर प्रभागनिहाय आरक्षणाचे प्रारुप प्रसिद्ध केली जाणार आहेत. प्रभागनिहाय आरक्षण निश्चितीबाबत हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी २३ जून ते ३० जून २०२३ असा राहणार आहे. उपविभागीय अधिकारी यांनी प्राप्त हरकती विचारात घेऊन ६ जुलैपर्यंत अभिप्राय देणे. त्यांनतर १२ जुलैला उपविभागीय अधिकारी यांचे अभिप्राय विचारात घेऊन अंतिम अधिसूचनेस (नमुना अ) जिल्हाधिकाऱ्यांनी मान्यता देणे, जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य केलेल्या अंतिम प्रभाग रचनेला (नमुना अ) व्यापक प्रसिध्दी १४ जुलैला दिली जाणार असल्याचे ग्रामसभेत निवडणूक अधिकारी कांबळे यांनी सांगितले.