“ऑरबिट योगा स्टुडिओचा” आज सावंतवाडीत दिमाखात शुभारंभ….

8
2
Google search engine
Google search engine

आरोग्य निरोगी व सुदृढ ठेवण्यासाठी मदत होणार; मान्यवरांचा विश्वास, उपस्थितांकडून शुभेच्छा….

सावंतवाडी ता. २०: येथील युवा उद्योजक विनेश तावडे यांच्या संकल्पनेतून सावंतवाडीत सुरू करण्यात आलेल्या “ऑरबिट योगा स्टुडिओ” चा शुभारंभ युवरांज्ञी श्रद्धा राणी भोसले यांच्या हस्ते आज करण्यात आला. दरम्यान या योगा स्टुडिओच्या माध्यमातून आपले आरोग्य निरोगी व सुदृढ ठेवण्यासाठी सावंतवाडीकरांना त्याचा नक्कीच फायदा होईल, असा विश्वास या प्रसंगी उपस्थित मान्यवरांकडून व्यक्त करण्यात आला. जागतिक योगा दिनाचे औचित्य साधून या योगा स्टुडिओचा उद्घाटन सोहळा मोठया दिमाखात संपन्न झाला. या ठिकाणी प्रशिक्षक म्हणून योग तज्ञ अमोल सोनावणे हे प्रशिक्षण देणार आहेत. तरी जास्तीत-जास्त नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. तावडे यांनी केले आहे.
यावेळी आहार तज्ञ डॉ. विनया बाड, अटल प्रतिष्ठानचे अध्यक्ष नकुल पार्सेकर, भरत गावडे, सिताराम गावडे, देव्या सूर्याजी, माझी जिल्हा परिषद सदस्य प्रगती तावडे, सत्यविजय तावडे, प्रचिता तावडे, उद्विक तावडे, यशवंत मालवणकर, दत्ताराम कोळमेकर, माजी सरपंच संजय शिरसाट, रोशन डेगवेकर, प्रवीण राऊळ, शंकर मेस्त्री, बंड्या तायशेट्ये, गोपाळ गोवेकर, रविकांत लाड, अक्षय राऊळ, आकाश मोहिते, वेदांत कदम आदींनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच हा मॉर्डन पद्धतीचा “ऑरबिट योगा स्टुडिओ” सावंतवाडी सुरू झाला आहे. ठिकाणी विशेषतः एरिअल योगा, रोप योगा, व्हील योगा, चेअर योगा, पॉवर योगा, स्टेप एरोबिक, बॉल योगा आदी योगांचे प्रकार सावंतवाडीकरांना प्रथमच अनुभवता व शिकता येणार आहेत. तर यांसह हठयोग (मूलभूत, मध्यवर्ती, आगाऊ), अष्टांग विन्यासा, योगा संरेखन, झुंबा, प्राणायाम आणि ध्यान आदी योगांचे प्रशिक्षण सुद्धा मिळणारं आहे. त्यासाठी योगामध्ये उच्च शिक्षण घेतलेले योग तज्ञ अमोल सोनावणे प्रशिक्षण देणार आहेत. तसेच हा स्टुडिओ वातानुकूलित असुन नैसर्गिक पद्धतीने त्याची रचना करण्यात आली आहे. या प्रशिक्षणासाठी दरमहा माफक दर आकारले जाणार असून प्रथम ५० रजिस्ट्रेशनसाठी फी मध्ये आकर्षक सवलत दिली जाणार आहे. त्यामुळे मणक्याच्या तक्रारी, रोगप्रतिकारक शक्ती वाढविणे, जॉईन पेनिंग, पोटाच्या तक्रारी, शरीराची लवचिकता, मानसिक ताणतणाव, डिप्रेशन आधी समस्यांसाठी हा योगा स्टुडिओ आता उत्तम पर्याय बनेल, असा विश्वास उद्घाटन प्रसंगी बोलताना श्री. तावडे यांनी दिला. तर जास्तीत-जास्त सावंतवाडीकरांनी आणि परिसरातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, तसेच अधिक माहितीसाठी ७७४४०५७९८९ या नंबर संपर्क साधावा, किंवा पाटेश्वर कॉम्प्लेक्स, दुसरा मजला, मॅंगो हॉटेल शेजारी, कशाळीकर मेडिकलवर आमच्या योगा स्टुडिओला भेट द्यावी, असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले आहे.