आचऱ्यातील हल्ला प्रकरणी एका संशयितास जामीन…

25
2
Google search engine
Google search engine

मालवण, ता. २१ : आचरा येथील गौरव प्रकाश पेडणेकर याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेला संशयीत आरोपी प्रतीक एकनाथ हडकर (२१, रा. चिंदर सडेवाडी) याला जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. संशयिताच्यावतीने जामिनासाठी अॅङ हेमेंद्र गोवेकर व अॅङ समीर कुलकर्णी यांनी अर्ज दाखल केला होता.

आचरा येथे घडलेल्या गोळीबार व चाकू हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी शुभम संतोष जुवाटकर (वय- २७, रा. दांडी – मालवण ), तौकिर अब्दुलहमीद काझी (वय- २२, आचरा काझीवाडा), प्रतीक एकनाथ हडकर (वय-२१, रा. चिंदर सडेवाडी) या तिघांना अटक करण्यात आली होती. या गोळीबार प्रकरणामुळे आचरे गावात एकच खळबळ उडाली होती. काही दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर तिघांनाही न्यायालयाने न्यायालयानी कोठडी सुनावली होती. बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी संशयितांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. गेले ४८ दिवस संशयीत आरोपी न्यायालयीन कोठडीत होते.