दिव्यांग प्रशालेत शिकविणार्‍या शिक्षकांच्या पगाराचा मुद्दा अखेर मार्गी…

11
2
Google search engine
Google search engine

राजन तेलींची यशस्वी शिष्टाई; तात्काळ अदा करण्याचे मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांचे आश्वासन…

सिंधुदुर्ग,ता.३०: वेंगुर्ले येथील दिव्यांग प्रशालेत विद्यार्थ्यांना शिकवणार्‍या १७ शिक्षकांच्या पगाराचा मुद्दा भाजप जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राजन तेली यांच्या पुढाकारामुळे सुटला आहे. त्यांना गेले सहा महिन्याचे रखडलेले वेतन देण्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी मान्य केले आहे. याबाबतच्या तक्रारी संबधित शिक्षकांनी श्री. तेली यांच्याकडे केल्या होत्या. या पार्श्वभूमीवर श्री. तेली यांनी आज ओरोस येथे जावून श्री. नायर यांची भेट घेतली.

यावेळी वेतन रखडलेले संबधित शिक्षण उपस्थित होते. त्यांच्या म्हणण्यानुसार ते दिव्यांग प्रशालेत संबधित विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनाचे धडे देत आहे. मात्र गेले ६ हून अधिक महिने त्यांचे वेतन झाले नव्हते. त्यामुळे त्यांनी याबाबतची नाराजी श्री. तेली यांच्याकडे व्यक्त केली होती. त्यानंतर श्री. तेली यांनी भेट घेवून हा मुद्दा अखेर निकाली काढला आहे. त्यामुळे संबधित शिक्षकांनी जिल्हा परिषद प्रशासनासह तेलींचे आभार मानले