मालवणचे नूतन पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी पदभार स्वीकारला…

35
2
Google search engine
Google search engine

मालवण, ता. १ : मालवण पोलीस ठाण्याचे नूतन पोलीस निरीक्षक म्हणून प्रवीण अशोक कोल्हे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काल रात्री त्यांनी पदभार स्वीकारला. यावेळी कर्मचाऱ्यांच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.

पोलीस निरीक्षक विजय यादव हे सेवानिवृत्त झाल्याने त्यांच्या जागी श्री. कोल्हे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रवीण कोल्हे हे गेली १७ वर्षे पोलीस दलात अधिकारी पदावर सेवा बजावत आहेत. २००६-०७ या वर्षी पोलीस उपनिरीक्षक म्हणून ते सेवेत रुजू झाले. २०१० पर्यत त्यांनी गडचिरोली येथे सेवा बजावली. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षकपदी रायगड व ठाणे ग्रामीण येथे आठ वर्षे ते कार्यरत होते. २०१९ या वर्षी पोलीस निरीक्षक म्हणून त्यांना बढती मिळाली. राज्य गुप्त वार्ता विभाग मुंबई याठिकाणी त्यांनी सेवा बजावली.

श्री. कोल्हे म्हणाले, येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीत कायदा सुव्यवस्था राखली जाईल. स्थानिक पातळीवरील वाहतूक कोंडी व अन्य समस्या पोलीस व स्थानिक प्रशासन, लोकप्रतिनिधी, व्यापारी, नागरिक यांच्या सहकार्यातून सोडवल्या जातील. तसेच नागरिकांच्या तक्रारी, महिला छेडछाड, अन्य तक्रार तसेच कुठेही अवैध धंदे सुरू असतील तर त्याबाबत ही तक्रार नागरिकांनी थेट आपल्याकडे करावी, तक्रारीची दखल तात्काळ घेतली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले. यासाठी त्यांनी आपला मोबाईल क्रमांक ९७६७७००५०१ जनतेसाठी उपलब्ध करून दिला आहे. तर ११२ या टोल फ्री क्रमांकावरही नागरिक तक्रार करू शकतात. सर्वांच्या सहकार्याने कायदा व सुव्यवस्था राखली जाईल असे श्री. कोल्हे यांनी स्पष्ट केले.