डी.एड, बी.एड बेरोजगारांना सामावून घेण्याची मागणी उपमुख्यमंत्र्यांकडे करणार…

22
2
Google search engine
Google search engine

नितेश राणे; निवृत्त शिक्षकांना सामावून घेण्याबाबत अनेक अडचणी असल्याचे म्हणणे…

कणकवली,ता.१२: डी.एड व बी.एड बेरोजगार उमेदवारांना जिल्ह्यातील शाळांमध्ये शिक्षण सेवक म्हणून संधी देण्यात यावी, अशी मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार आहे, असा शब्द भाजपाचे युवा नेते तथा आमदार नितेश राणे यांनी दिला. निवृत्त शिक्षकांना शाळेत पुन्हा सामावून घेण्याच्या निर्णयात वयोमानानुसार काही अडचणी आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी जिल्ह्यातील उमेदवारांचा विचार व्हावा, असे आपले मत आहे. तसेच जिल्ह्यातील संबधित संघटनानी तशी मागणी केली आहे. त्यामुळे आपण त्या दृष्टीने पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शाळा मध्ये असलेल्या शिक्षकांच्या रिक्त जागेवर निवृत्त शिक्षकांना घेण्या संदर्भात शासनाकडुन अध्यादेश काढण्यात आला आहे. या आदेशाला जिल्ह्यातील बीएड, डीएड संघटनानी विरोध केला आहे. तर दुसरीकडे काही शिक्षक हे वयोमानानुसार त्या ठिकाणी काम करू शकत नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेत राणे यांचे लक्ष वेधले असता त्यांनी ही भूमिका मांडली आहे.