गुळदुवे ग्रामपंचायतच्या वतीने उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार…

19
2
Google search engine
Google search engine

 

बांदा,ता.१२: गुळदुवे गावातील दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या स्वच्छ गाव, सुंदर गाव या उपक्रमांतर्गत गुळदुवे ग्रामपंचायतच्या वतीने सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी प्रास्तविकात उपसरपंच अशोक धर्णे यांनी विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाचे कौतुक करून, कुठल्याही विद्यार्थांना शिक्षणासाठी मदत हवी असल्यास आपण ती मदत करणार असल्याचे यावेळी सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष आरोंदा हायस्कूलचे सेवानिवृत्त माजी मुख्याध्यापक अरुण धर्णे यांनी उपस्थित विद्यार्थांना मोबाईल वापराचे फायदे व दुष्परिणाम याबाबत योग्य असे मार्गदर्शन केले. तसेच मोबाईलचा अतिरेक टाळण्याबाबत आवाहन केले. मराठी माध्यमातून आपल शिक्षण झालं तरी आपण मोठ्या हुद्यापर्यंत मजल मारू शकतो असेही त्यांनी यावेळी सांगून उपस्थित विद्यार्थांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाची सुरुवात देवी सरस्वतीच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून तसेच मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी सरपंच शैलेंद्र जोशी यांनी मुलांच्या यशाबद्दल कौतुक केले. कार्यक्रमात यशस्वी विद्यार्थ्यांचा ग्रामपंचायत तर्फे नारळ रोप, सुपारी रोप, गुलाब पुष्प तसेच मेडल व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. गुळदुवे प्राथमिक शाळा नं. २ येथे हा कार्यक्रम पार पडला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक केले. विद्यार्थ्यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करून ग्रामपंचायतचे आभार मानले.
यावेळी सरपंच शैलेंद्र जोशी, उपसरपंच अशोक धर्णे, माजी मुख्याध्यापक अरुण धर्णे, बाबी धर्णे, ग्रामपंचायत सदस्य सुधीर जोशी, राजश्री जोशी, श्रध्दा सावंत, दिपगौरी मामलेकर, शिक्षक रमेश गावडे, ग्रामविस्तार अधिकारी स्वप्ना बगळे तसेच रुपेश धर्णे, गणपत कारेकर, मिलिंद नाणोसकर, मदन मुरकर, संगीता जोशी, किशोरी केदार, आशा स्वयंसेविका सरिता शेटकर, संतोष सावंत, कर्मचारी अनिल शेटकर, विद्यार्थी, पालक आदी उपस्थित होते. आभार स्वप्ना बगळे यांनी मानले.