जास्तीत-जास्त पत्रकारांना अधिस्वीकृती मिळण्यासाठी प्रयत्न करणार…

26
2
Google search engine
Google search engine

गजानन नाईक; सावंतवाडी पत्रकार संघाच्यावतीने सदस्य झाल्याने सन्मान…

सावंतवाडी,ता.१२: सोशल मीडियासह जिल्ह्यात प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मिडीयात काम काम करणाऱ्या जास्तीत-जास्त पत्रकारांना अधिस्वीकृती मिळण्यासाठी प्रयत्न करणार आहे असे, अभिवचन नवनिर्वाचित सदस्य गजानन नाईक यांनी आज येथे दिले. शासनाच्या कोल्हापूर विभागीय अधिस्विकृती समितीच्या सदस्यपदी निवड झालेल्या नाईक यांचा सावंतवाडी पत्रकार संघाच्यावतीने सन्मान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

यावेळी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष प्रवीण मांजरेकर यांनी ज्येष्ठ पत्रकार गजानन नाईक यांचे अधिस्वीकृती समितीवर निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले. नाईक यांची या समितीवर निवड झाल्यामुळे सावंतवाडीसह जिल्हा पत्रकार संघालाही सन्मान प्राप्त झाला आहे. आपल्या हक्काचा माणूस या समितीवर असल्यामुळे स्थानिक पत्रकारांना अधिकृति प्राप्त करण्यासाठी त्याचा निश्चितच फायदा होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. सोशल मिडीयाचे जिल्हाध्यक्ष अमोल टेंबकर, तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष राजेश मोंडकर, विजय देसाई, विद्यमान अध्यक्ष हरिश्चंद्र पवार, जिल्हा पत्रकार संघाचे खजिनदार संतोष सावंत, राजू तावडे यांनीही नाईक यांना यावेळी शुभेच्छा दिल्या. यावेळी पत्रकार तथा वितरक प्रसाद माधव यांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन करण्यात आले. स्वागत तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार तर आभार खजिनदार रामचंद्र कुडाळकर यांनी व्यक्त केले.

यावेळी सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार,सोशल मिडीयाचे जिल्हाध्यक्ष अमोल टेंबकर, जिल्हा पत्रकार संघाचे खजिनदार ॲड. संतोष सावंत, माजी अध्यक्ष राजेश मोंडकर, विजय देसाई, प्रवीण मांजरेकर, ज्येष्ठ पत्रकार राजू तावडे, नरेंद्र देशपांडे, पत्रकार उमेश सावंत, सचिन रेडकर, रुपेश हिराप, दीपक गांवकर, विनायक गांवस, रामचंद्र कुडाळकर, जतिन भिसे, सचिन मांजरेकर, अशोक बोलके, सिद्धेश सावंत, भूवन नाईक, विजय माधव आदी उपस्थित होते.