वेंगुर्ला तालुक्यात सर्वाधिक १४७.८ मि.मी. पाऊस…

5
2
Google search engine
Google search engine

सिंधुदुर्गनगरी,ता.१४: जिल्ह्यात गेल्या चौवीस तासात वेंगुर्ला तालुक्यात सर्वाधिक १४७.८ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी १२२.६ मि.मी. पाऊस झाला असून एकूण सरासरी १२०६.३ मि.मी. पाऊस झाला आहे.
तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. देवगड- ११०.९ (११६४.१), मालवण- १२५.८ (१२०४.६), सावंतवाडी- १३५.९ (१४०८.४), वेंगुर्ला-१४७.८ (१२३२.१), कणकवली- ११७.३ (१०६८.१), कुडाळ- १२०.६ (१२०३.१), वैभववाडी- १०१.२ (११३८.४), दोडामार्ग-११७.२ (१३१४.२) असा पाऊस झाला आहे.