अल्पवयीन मुलीवर अत्याचार, तालुक्यातील दोघे ताब्यात…

18
2
Google search engine
Google search engine

सावंतवाडी पोलिसांची कारवाई; अन्य काहींचा सहभाग, त्या दृष्टीने तपास सुरू…

सावंतवाडी,ता.१७: अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी तालुक्यातील दोघांना आज येथील पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणात आणखी कोणी आहे का, याचा तपास सुरू आहे. उद्या त्या दोघांनाही येथील न्यायालयात हजर करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिस निरिक्षक ॠषिकेश अधिकारी यांनी दिली.
दरम्यान हे प्रकरण घडल्यानंतर संबंधित अत्याचारीत मुलीच्या वडिलांनी येथील पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. मात्र संबंधितांवर कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती. या प्रकरणी आज राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांनी पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांची भेट घेवून पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यानुसार संशयित दोघांना ताब्यात घेण्यात आल्याचे श्री. अधिकारी यांनी सांगितले.