तुळस येथील युवकाला वाचविणाऱ्या मातोंड ग्रामस्थांचा गावाच्या वतीने सन्मान..

12
2
Google search engine
Google search engine

 

वेंगुर्ले ता.२३: मातोंड व होडावडा या दोन गावांना जोडणाऱ्या पुलाच्या शेजारी आलेल्या पुराच्या पाण्यात एका झाडावर तब्बल ३ तास अडकलेल्या तुळस येथील ३७ वर्षीय तरुणाला २० जुलै रोजी मध्यरात्री मातोंड ग्रामस्थांनी बचाव कार्य करत सुखरूप बाहेर काढले. या त्यांच्या धाडसाबद्दल तुळस येथील ग्रामस्थ व आर.सी.सी. देउळवाडा मित्रमंडळ तुळसच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
तुळस येथील श्री देव जैतीर मंदिरात मातोंड येथील ग्रामस्थ होमगार्ड समादेशक अधिकारी संतोष विष्णू मातोंडकर, ग्रामस्थ ज्ञानेश्वर मोहिते, कृष्णकांत घोगळे, विशाल घोगळे, अनिकेत जोशी, राहुल प्रभू, गिरीश प्रभू, सौरभ घोगळे, सुहास घोगळे, बाळा मोहिते, नाना मोहिते यांचा शाल श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन सन्मान केला. यावेळी तुळस देवस्थानचे प्रमुख मानकरी अनिल परब, दिवाकर परब, रमेश परब, यशवंत उर्फ बाळू परब, रामू परब, दादा परब, सातोळी- बावळाट सरपंच सौ. परब, तुळस ग्रामपंचायत सदस्य जयवंत तुळसकर, गुंडू परब, दिलीप परब, मंदार तुळसकर, रमेश कबरे, दिपेश परब, प्रथमेश परब यांच्यासहित आर.सी.सी. देउळवाडा मित्रमंडळचे सदस्य, सिद्धेश परब व त्याचे कुटुंबीय आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार दिपेश परब यांनी केले.